शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ‘मोहर’?

By admin | Updated: September 25, 2014 00:21 IST

रत्नागिरी विधानसभा : लोकसभेच्या पुनरावृत्तीची भाजपला संधी

प्रकाश वराडकर -रत्नागिरी -जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची २००९मध्ये पुनर्रचना झाली, अन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा भूगोलही बदलला. तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील नावडी हा गट समाविष्ट झाला. त्यामुळे युतीचे प्राबल्य मतदारसंघात अधिक वाढले. परंतु ते जिल्हा परिषद व पंचायत समितीपुरतेच सीमित राहिले. २००५ व २००९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने विजय संपादन करून राजकीय चमत्कार घडविला. भूगोल युतीच्या बाजूने असतानाही इतिहास बदलण्याचा चमत्कार कसा घडला, याचीच चर्चा होत राहिली. या निवडणुकीत विधानसभेच्या बदललेल्या भूगोलावर राष्ट्रवादीची मोहर पुन्हा उमटणार की, लोकसभा निवडणुकीतील युतीच्या मताधिक्याची पुनरावृत्ती होऊन राष्ट्रवादीला धक्का बसणार, याकडेच आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यापुरताच मर्यादित होता. मात्र, २००९मध्ये जिल्ह्यातील मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यात संगमेश्वर तालुका लांजा-राजापूर, चिपळूण व रत्नागिरी मतदारसंघात विभागला गेला. संगमेश्वर तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील नावडी जिल्हा परिषद गट रत्नागिरी मतदारसंघात समाविष्ट झाला. त्यामुळे पूर्वीच्या आठऐवजी या मतदारसंघात जिल्हा परिषद गटांची संख्या ९ झाली. समाविष्ट झालेला नावडी गट सेनेचाच बालेकिल्ला असल्याचे २०१२च्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट झाले. मतदारसंघाचा भूगोल बदलल्यानंतरही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय वर्चस्व युतीचेच राहिले. नावडी गटही सेनेच्याच वर्चस्वाखाली आला. त्यामुळे या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी वाटद हा एकच गट राष्ट्रवादीने जिंकला. तेथे प्रसाद ऊर्फ बाबू पाटील विजयी झाले. पावस गटात बहुजन विकास आघाडीने राष्ट्रवादीची मदत घेतली. त्यामुळे नंदकुमार मोहिते यांनी विजय मिळविला. याव्यतिरिक्त आघाडीला या विधानसभा मतदारसंघात अन्य गटांवर वर्चस्व मिळविता आले नाही. अन्य सातही जिल्हा परिषद गटांवर सेना-भाजपा युतीने वर्चस्व प्रस्थापित केले. त्यातील हातखंबा, नाचणे, गोळप व संगमेश्वर तालुक्यातील परंतु रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील नावडी गटातही सेनेनेच विजयाचा झेंंडा राजेश मुकादम यांच्या विजयाच्या रुपाने फडकावला. हातखंबा गटात उदय बने, नाचणे गटात विनया गावडे, गोळप गटात देवयानी झापडेकर सेनेच्या शिलेदारांनी विजय संपादन केला. करबुडे गटात शुभांगी देसाई, कोतवडे गटात सतीश शेवडे, शिरगाव गटात विजय सालीम हे भाजपा उमेदवार जिंकले. नऊपैकी तब्बल सात गटात युतीचे वर्चस्व असतानाही युतीचा येथील उमेदवार विजयी होऊ शकला नाही. गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत युतीच्या या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला. त्यामुळे मतदारसंघाचा भूगोल बदलूनही विधानसभेच्या विजयाचा गड गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये युतीला सर करता आला नाही, हा चमत्कारच मानला जात आहे. मात्र, या चमत्कारामागे युतीतीलच काहींचा नमस्कार असल्याची चर्चा गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये होती. लोकसभा निवडणुकीत विधानसभेप्रमाणे चमत्कार घडला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीतील युतीच्या यशाची पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघात होणार की पुन्हा राष्ट्रवादीच आपला राजकीय करिश्मा दाखविणार, याबाबत आता सर्वांनाच उत्कंठा आहे. घोडामैदान जवळ आहे. येत्या दोन दिवसांनंतर निवडणूक अश्व चौखूर उधळणार आहेत. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना आता १५ आॅक्टोबरच्या मतदानाची व त्यानंतर १९ आॅक्टोबर २०१४ रोजी होणाऱ्या मतमोजणीतील निकालाची प्रतीक्षा आहे.