शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, काजू विमा हप्त्यात कपात

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

विमा संरक्षणाचे काम टाटा एआयजी कंपनी पाहणार

ओरोस : जिल्ह्यातील काजू व आंबा बागायतदारांना देण्यात येणाऱ्या विमा संरक्षणासाठी वार्षिक हप्ता कमी करण्यात आला असून हा निर्णय बागायतदारांसाठी फायदेशीर आहे. विमा संरक्षणाचे काम आता कृषी विमा कंपनीऐवजी टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनी पाहणार आहे.पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता व वेगाचे वारे यापासून आंबा व काजू या फळपिकांना निर्धारीत कालावधीत विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य दिले जाते. आंबा बागायतदारांचे नुकसान झाल्यास १ लाख रूपये तर काजू बागायतदारांना ७५ हजार रूपये नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी आंबा बागायतदारांना वर्षाला ४ हजार ८७६ रूपये तर काजू बागायतदारांना ३ हजार ६०१ रूपये हप्ता भरावा लागणार आहे. यापूर्वी आंबा बागायतदारांना वर्षाला ६ हजार रूपये तर काजू बागायतदारांना ४ हजार ५०० रूपये हप्ता भरावा लागत होता. आता या हप्त्याची रक्कम कमी करण्यात आली आहे.या विमा योजनेत भाग घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देय राहील. विमा हप्ता प्रति हेक्टरी भरावयाचा आहे. आंबा बागायतदारांना विमा हप्ता भरण्याची ३१ डिसेंबर तर काजू बागायतदारांसाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. १ जानेवारी २०१५ ते १५ मे २०१५ या कालावधीत अवेळी पाऊस झाला. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीच्या कालावधीत जास्त तापमान झाले तर आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. (वार्ताहर)काजूला नुकसान भरपाई१ डिसेंबर २०१४ ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत अवेळी पाऊस तसेच जास्त तापमान झाले तर काजू बागायतदारांना ७५ हजार रूपये विमा संरक्षण दिले जाणार आहे. या विमा योजनेचा बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षकांच्यावतीने करण्यात आले आहे.