शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मालवणातील मच्छिमार पुन्हा आक्रमक

By admin | Updated: December 26, 2015 23:56 IST

पोलीस निरीक्षकांचे आवाहन : मच्छिमारांनी कायदा हातात घेऊ नये

मालवण : मालवणातील ट्रॉलर्स व्यावसायिकांनी हायस्पीड विरोधात किनारपट्टीवर तीव्र लढा उभारण्याचे निश्चित केले आहे. लवकरच सर्वपक्षीय आमदार, लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली जाणार असल्याचे मच्छिमारांनी स्पष्ट केले आहे. न्यायासाठी लढा तीव्र करणे गरजेचे आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच आमदार वैभव नाईक, नीतेश राणे यांसह रत्नागिरीतील आमदारांची भेट घेऊन मच्छिमार आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, परप्रांतीय हायस्पीड व पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी थांबवताना मच्छिमारांनी कोणत्याही स्वरुपात कायदे हातात घेऊ नये. बोटींना पकडल्यानंतर त्या बोटींवरील किंमती साहित्य चोरीला जाण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वीही असे प्रकार घडले असल्याने नाहक मच्छिमारांवर कारवाई करण्याची वेळ येईल. असा सूचक इशारा पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी मालवणातील ट्रॉलर्स, गिलनेट व्यावसायिकांना दिला आहे. दोन दिवसांपूर्वी सर्जेकोट येथील ट्रॉलर्स व्यावसायिक गोपीनाथ तांडेल यांना हायस्पीड धारकांकडून फोन वरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत सर्जेकोट व मालवण येथील ट्रॉलर्स व गिलनेटधारक व्यावसायिकांनी मालवण पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन या धमकीची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत त्या मोबाईल नंबरचे कॉल डीटेल्स मागविण्यात आलेले आहेत. जर धमकी देणारा कर्नाटक मलपी येथील असल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पोलीस महानिरीक्षक यांची परवानगी घेऊन योग्य ती कारवाई करू असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी) पालकमंत्री कर्नाटकचे आहेत काय ? कर्नाटक मलपी येथील हायस्पीड सिंधुदुर्गात धुमाकूळ घालत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अजूनही गप्पच आहेत. ते कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाहीत. अथवा कारवाईबाबत मत्स्य विभाग, पोलीस प्रशासनास आदेशही देत नाहीत. पालकमंत्री हे सिंधुदुर्गचे आहेत की कर्नाटकचे ? असा सवाल मच्छिमारांनी उपस्थित केला आहे.