शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयास टाळे ; गुन्हा दाखल

By admin | Updated: July 24, 2014 22:30 IST

श्री देव रवळनाथ देवस्थान समिती अध्यक्ष महादेव सोमा परब, ग्रामस्थ, देवस्थानचे मानकरी यांच्याविरूद्ध

सिंधुदुर्गनगरी : कोतवालपद भरतीत स्थानिक उमेदवाराला डावलल्याच्या रागातून ओरोस तलाठी कार्यालयास टाळे ठोकल्याप्रकरणी श्री देव रवळनाथ देवस्थान समिती अध्यक्ष महादेव सोमा परब, ग्रामस्थ, देवस्थानचे मानकरी यांच्याविरूद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओरोस तलाठी कार्यालयातील रिक्त असलेल्या कोतवालपदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीत स्थानिक उमेदवाराला डावलल्याच्या रागातून ग्रामस्थांनी श्री देव रवळनाथ देवस्थान समितीने ओरोस तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले होते. २१ जुलै रोजी ही घटना घडली होती. ओरोस तलाठी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे तलाठी रवींद्र निपाणीकर १८ जुलै रोजी दुपारी २ वाजता कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर कार्यालयास कुलूप लावून गेले असता त्या कुलपावर श्री देव रवळनाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव परब, ग्रामस्थ, देवस्थानच्या मानकऱ्यांनी दोन कुलपे लावली असल्याचे मंगेश सखाराम यादव यांनी तलाठी निपाणीकर यांना कळविले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव परब यांनी कोतवाल भरतीमध्ये नारायण राणे यांना नेमणूक न दिल्याने तलाठी कार्यालयाला कुलूप लावल्याचे यावेळी सांगितले. यावरून तलाठी रवींद्र निपाणीकर यांनी या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल्यानंतर ही तक्रार अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्यात आली आहे. यासंबंधी अधिक तपास ठाणे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत सावंत करीतआहेत. (प्रतिनिधी)