शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाकडे पाठ

By admin | Updated: February 2, 2015 00:07 IST

या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देणे व परिस्थिती जाणून घेणे आवश्यक होते.

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्याच्या एकूणच वैद्यकीय सेवेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली असताना, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा आरोप नागरिकांकडून होत असताना याकडे दुर्लक्ष करून जिल्हा रुग्णालयाला भेट न देताच आरोग्य राज्यमंत्री परस्पर माघारी फिरल्याने त्यांच्या या पर्यटन सफरीबाबत नेमके इंगित काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेदरम्यान जयश्री शिंगाडे या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. तर संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संबंधित महिलेच्या नातेवाइकांकडून होत आहे. यासाठी कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय ओरोस येथे तीव्र आंदोलनही छेडण्यात आले. तसेच गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेत तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमून त्यांच्या अहवालानुसार कारवाई करण्याचा आणि आमदार वैभव नाईक यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देणे व परिस्थिती जाणून घेणे आवश्यक होते. मात्र, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री शनिवारी जिल्हा दौऱ्यावर असताना व त्यांचा जिल्हा रुग्णालयाला भेट देण्याचा निश्चित दौरा असूनही ते या रुग्णालयाकडे फिरकलेले नाहीत. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयाची आरोग्यसेवा ढासळली असताना व हलगर्जीपणामुळे एका ४० वर्षांच्या महिलेचा बळीगेल्याची घटना ताजी असतानाही या समस्येकडे आरोग्य राज्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करावे आणि केवळ जिल्ह्याची पर्यटन सफर करावी, याबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. जिल्हा मेडिकल कक्षाचे औपचारिक उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, ते फिरकलेच नसल्याने मेहनतीवर पाणी फेरले, तर पुष्पगुच्छ कोमेजले. (प्रतिनिधी)