शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

तेलताडमुळे खाद्यतेलाची गरज पूर्ण

By admin | Updated: January 2, 2015 00:23 IST

उत्तम महाडकर : तेलताड प्रशिक्षकांकरिता पाच प्रशिक्षण कार्यक्रम

कुडाळ : तेलताड हे बदलत्या हवामानाचा फारसा परिणाम न होणारे पीक असून, देशाच्या खाद्यतेल उत्पादनाच्या अभियानात हे पीक अत्यंत महत्त्वाचे, तसेच खाद्यतेलाची वाढती गरज भरून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे आहे, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर यांनी तेलताड प्रशिक्षकांकरिता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपात बोलताना केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित तेलताड प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, राष्ट्रीय तेलबिया आणि तेलताड अभियान, नवी दिल्ली आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तेलताड लागवड व व्यवस्थापन या विषयावर एकूण पाच प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन मुळदे येथील तेलताड प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर नुकतेच झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमातून कोल्हापूर, सिंधुुदुर्ग आणि गोवा येथील सुमारे १०५ कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट एकत्रितपणे तेलताड लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यावर भर देणार आहेत. या संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किसन लवांडे, संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत साळवी, मृदशास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. साळवी, तेलताड प्रकल्पाचे माजी प्रमुख प्रा. आनंद कुुंभार, प्रकल्पाचे समन्वयक प्रा. महेंद्र गवाणकर, हवामान शास्त्रज्ञ प्रा. राजेश मुळे, प्रगतशील शेतकरी बाजीराव झेंडे आणि गोदरेजचे विभागीय व्यवस्थापक समीर पैरायकर, आदी मान्यवर तज्ज्ञांनी प्रशिक्षणार्थींना तेलताड तंत्रज्ञान आणि इतर अनुषंगिक बाबींबाबत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)कृषी विभाग कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिकाबदलत्या हवामानामध्ये आंबा व काजू यासारख्या महत्त्वाच्या पिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, शेतकऱ्यांकरिता ही मोठी चिंतेची बाब आहे. परंतु, पर्यायी पीक म्हणून भविष्यात या पिकाचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये करण्याकरिता कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका असून, विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील या तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा पूल म्हणून जबाबदारी स्वीकारावी, अशी अपेक्षा यावेळी महाडकर यांनी व्यक्त केली.