शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहतुकीसाठी कोकण - विकास आघाडीचे साकडे

By admin | Updated: July 28, 2014 23:14 IST

गणपत चव्हाण - महामार्गाच्या समुद्रकिनारी सुमारे ४० लाख कोकण वस्ती

कणकवली : मुंबई-गोवा या महामार्गाचे चौपदरीकरण करावे, पश्चिम किनारी सागरी महामार्ग पूलासहित पूर्ण करावा आणि कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर जलवाहतुक सुरू करावी या प्रमुख तीन मागण्यांचे निवेदन कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी केंद्रीय सार्वजनिक दळणवळण-जलवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना सादर केले आहे. अशी माहिती कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक गणपत चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली.मुंबई-गोवा या अरूंद महामार्गावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. वळणावळणाचा, चढउतार डोंगरघाट आणि ब्रिटीशकालीन अरूंद पुल यामुळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांमुळे या महामार्गाची वाताहात झाली आहे, चिपळूणनजीकचा कशेडी घाट खूप धोकादायक झाला आहे. त्यामुळे या घाटाला पर्यायी मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे. राज्यातील पुणे-बेंगलोर मार्गामध्ये कात्रज घाट ते खंबाटकी घाट वगळण्यासाठी बोगदे तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कशेडी घाटाला पर्यायी बोगदा तयार करण्यात यावा. या पर्यायी मार्गामुळे गोव्यापर्यंतचे अंतर ६० किलोमीटर कमी होणार आहे. आता या महामार्गाला प्राधान्य देण्यात यावे, असे या निवेदनात म्हटले आहे. पश्चिम किनारी सागरी महामार्ग देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मागील लोकसभेत हे जाहीर करण्यात आले. मात्र या मार्गाचे बांधकाम संथगतीने चालले आहे. गेले २५ वर्षे या मार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या समुद्रकिनारी सुमारे ४० लाख कोकण वस्ती आहे. आगामी दहशतवादी हल्ले समुद्रमार्गे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेसाठी या मार्गाचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. कोकणाला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. गेली ३० वर्षे किनाऱ्यावरील प्रवासी बोट वाहतुक बंद आहे. जलवाहतुक सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)