शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली : विसर्जन मिरवणुकांनी रंगत

By admin | Updated: October 5, 2014 23:05 IST

नवरात्रोत्सवाची सांगता : दहा दिवस कार्यक्रमांची रेलचेल

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात गेले दहा दिवस मोठ्या उत्साहात सुरु असलेल्या नवरात्रोत्सवाची सांगता श्री दुर्गादेवीला निरोप देऊन करण्यात आली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. येथील जानवली नदीवरील गणपती सान्यावर श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.श्री दुर्गादेवीची ढोलताशांच्या गजरात शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कणकवली शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, बाजारपेठ मित्रमंडळ, कणकवली तालुका गोंधळी समाज संघाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवाचा समावेश होतो. घटस्थापनेने मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला होता. गेले दहा दिवस विविध धार्मिक, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रुप डान्स स्पर्धा, दशावतारी नाट्यप्रयोग, डबलबारी भजनाचे सामने, गीतगायन मैफिल अशा कार्यक्रमांचा समावेश होता. गरबा नृत्यालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभत होता. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गादेवीला निरोप देण्यात आला. सायंकाळी ५ वाजल्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी भव्य मिरवणुका विविध मंडळाच्यावतीने काढण्यात आल्या. ढोलताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या मिरवुणकीमध्ये लहानथोर सहभागी झाले होते. इतरांपेक्षा आपली विसर्जन मिरवणूक सरस व्हावी यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील होते. रात्री १.३० वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. ढोलताशांसह डीजेचाही वापर या मिरवणुकांमध्ये करण्यात आला. (वार्ताहर)