शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कमलाकर साळसकर ठरले कर्तव्यदक्ष पोलीस

By admin | Updated: July 15, 2015 00:19 IST

२४ तास ‘आॅनड्युटी’ : कौतुकास्पद काम, प्रशासनाकडून गौरव आवश्यक

रजनीकांत कदम - कुडाळ -चोरीच्या सत्राने भंडावून सोडलेल्या पोलीस कारभाराची रात्रपाळीची ड्युटी करून विश्रांतीसाठी तो घरी परतत होता. वाट घराची असली तरी विचार मात्र चोरीच्या तपासाचेच असल्याने मन सैरभैर होते. वाटेतच एक तेवीशीचा युवक चालत होता. त्याच्याजवळ असणारी बॅग व त्याचे झपाझप चालणे, तसेच संशयी नजर यामुळे रात्रभर ड्युटी करणाऱ्या त्या पोलिसाला अस्थिर झाले. त्याने न राहूनही चौकशी केली अन् तोच निघाला अट्टल चोरटा. रात्रपाळी करूनही चोवीस तास ‘आॅन ड्युटी’ राहत कर्तव्य बजावणाऱ्या त्या पोलिसाने आपणासह जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाची मान ताठ केली. कुडाळचे पोलीस कर्मचारी कमलाकर साळसकर यांच्या कर्तव्यदक्षतेने चोरटा सापडला. पण याचा यथोचित गौरव प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाची एकावर एक अशा अनेक प्रकरणांनी कोंडी होत असताना साळसकरचे हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे.कुडाळ येथील पोलीस कर्मचारी साळसकर हे शनिवारी रात्री आपली रात्रपाळीची ड्युटी आटोपून ओरोस येथील घरी परतत असताना वेताळबांबर्डे येथील महामार्गावरून चालत जाणाऱ्या एका युवकाला पाहून त्याचा संशय आला. त्यांनी युवकाला थांबवून त्याची चौकशी केली व त्याच्याकडील बॅग तपासत असताना चोरट्याच्या बॅगेतील चोरी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू व काही दागिने पाहून हाच चोरटा असल्याची खात्री साळसकर यांची झाली. मात्र चोराच्या लक्षात येताच त्याने तेथून धूम ठोकली. साळसकर यांनी शिताफीने त्याचा पाठलाग केला पण तो पसार झाला. साळसकर यांनी याबाबत तत्काळ कुडाळ पोलिसांना माहिती दिली.साळसकर यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे पोलिसांची तीन पथके वेताळबांबर्डे येथे तत्काळ दाखल झाली. चोरट्याचा वेताळबांबर्डे नजीकच्या जंगलभागात शोध घेण्यात आला. अखेर सायंकाळी उशिरा सुकळवाड येथे रेल्वेरुळाच्या ठिकाणी चोरटा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तपासाची चक्रे त्या दिशेने फिरली आणि बारा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. ग्रामस्थांचीही मेहनत साळसकर यांनी चोरटा वेताळबांबर्डे येथील जंगलात पळाल्याचे कळताच जिल्ह्यातील पोलिसांची तीन विशेष पथके व ग्रामस्थ दिवसभर या चोरट्यांचा शोध रविवारी संपूर्ण दिवसभर घेत होती. पोलीस आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच चोरट्याला पकडण्यात यश आले. ...त्यामुळेच चोरटे पकडलेपोलीस कर्मचारी साळसकर हे आपली रात्रपाळी आटोपून घरी जात असताना वाटेत दिसलेल्या संशयीत युवकाची त्यांनी चौेकशी केली. तसेच त्याच्याकडील बॅगचीही तपासणी केल्यानंतर तो चोरटा असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांना तत्काळ याबाबत माहिती दिली. त्यामुळे चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याला पकडल्याने आता इतर चोरट्यांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होणार आहे. त्यामुळे साळसकर यांचा प्रशासनाकडून गौरव होणे गरजेचे आहे. कर्तव्यदक्ष जागृत पोलिसाचे दर्शन साळसकर घरी जात असताना त्यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साळसकर यांच्यातील ‘पोलीस’ हा कर्तव्यदक्षतेसाठी ‘आॅन ड्युटी २४ तास’ जागृत आहे, याचा अनुभव यामुळे आला.