शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूबाबत सरपंचांना मदतीची साद

By admin | Updated: February 26, 2015 00:11 IST

जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवले पत्र

रत्नागिरी : राज्यात स्वाईन फ्लूचे वाढते प्रमाण पाहता जिल्ह्यात आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी सहकार्य करावे, अशी साद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी जिल्ह्यातील सरपंचांना घातली आहे.सध्या राज्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. त्यांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरात ‘स्वाईन फ्लू’ची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मौजे गवाणे (ता. लांजा) आणि भाटीमिऱ्या (ता. रत्नागिरी) येथे ‘स्वाईन फ्लू’चा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी व डोकेदुखी आदी ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जावे, असेही सरपंचांना पाठवलेल्या पत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे. आपल्या जिल्ह्यात प्रामुख्याने मुंबई व पुणे येथून येणाऱ्या चाकरमान्यांकडून कदाचित ‘स्वाईन फ्लू’ची लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातही सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.आपल्या कार्यक्षेत्रात ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे आढळल्यास त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात पाठवावे. ‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सरपंचांना केली आहे. (शहर वार्ताहर)