शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी चिंतेत; सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे भातशेती जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 13:09 IST

गेले दोन-तीन दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.

सिंधुदुर्ग - गेले दोन-तीन दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान गुरूवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण अधिकचं वाढले आहे. तर शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार कायम राहीली आहे. या पावसाचा भात शेती वर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. भात शेती जमीन-दोस्त होऊन पाण्याखाली गेल्यामुळे भाताला “अंकुर” फुटण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व परस्थितीत जिल्ह्यात ओला दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र विधानसभेच्या धामधुमीत याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी बांधवामधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.

यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे काही ठिकाणी महाप्रलय आला होता यात अनेकांचे संसार शेती पाण्याखाली गेली होती. दरम्यान, नंतर या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर या सगळ्या परिस्थितीतून स्वतः ला सावरत लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पाऊस कमी झाल्यानंतर सनईच्या हंगामात पुन्हा दमदार पाऊस सुरू झाल्यामुळे हातातोंडाशी आलेली भात शेती पाण्याखाली गेली आहे. तर शेती जमीन दोस्त झाल्यामुळे भात पिकाला अंकुर फुटण्यास सुरुवात झाली आहे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे मात्र, विधानसभेच्या धामधुमीत या बळीराजाकडे लक्ष देण्यासाठी सरकार कमी पडल्यामुळे शेतकरी बांधवा मधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरी