शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात मुसळधार

By admin | Updated: June 7, 2015 00:46 IST

दरड कोसळली : करूळ घाटात वाहतूक विस्कळीत

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यासह विविध भागात शनिवारी सायंकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. कणकवली शहरात सायंकाळी ६ वाजता मेघगर्जनेसह सुरू झालेल्या पावसाने तब्बल दोन तासांनी काहीशी उघडीप दिली. मात्र, रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता, तर वैभववाडी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. करूळ घाटात दरड कोसळल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, रात्री ८.३0 वाजता ही वाहतूक सुरळीत झाली. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. कणकवलीत ४ वाजल्यापासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६ च्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तब्बल दोन तास झालेल्या पावसाने सखल जागेत पाणी साचले होेत, तर पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोट आदी साहित्य नसल्याने अनेक नागरिकांना बाजारपेठेतील दुकानांमध्येच अडकून पडावे लागले. रात्री आठच्या सुमारास पाऊस कमी झाल्यानंतर या नागरिकांना दिलासा मिळाला. शहरातील वीजप्रवाह काही काळ खंडित झाला होता. नांदगाव, तळेरे, फोंडाघाट, आदी भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र, या पावसामुळे कुठेही नुकसान झाल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात झालेली नव्हती. काहीशी उसंत घेतलेला पाऊस रात्री उशिरापर्यंत कोसळत होता. (वार्ताहर) दोन तास वाहतूक ठप्प शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ६.३०च्या सुमारास करूळ घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू होती. कोसळलेल्या दरडीमुळे वाहनांना अपघात होऊ नये म्हणून पोलीस कोसळलेल्या दरडीच्या ठिकाणी हजर होते. रात्री ७.४५च्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू झाले. यावेळी वाहतूक थांबविली होती. रात्री ८.३०नंतर करुळ घाटातील वाहतूक सुरळीत झाली.