शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवा

By admin | Updated: November 19, 2014 23:25 IST

प्रमोद जठार : मालवणातील जनता दरबारात भाजप कार्यकर्त्यांना सूचना

प्रमोद जठार : मालवणातील जनता दरबारात भाजप कार्यकर्त्यांना सूचनामालवण : देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आली आहे. तुम्ही आता विरोधी पक्षातले कार्यकर्ते राहिला नसून सत्ताधारी पक्षाचे घटक बनला आहात. गावागावात, वाडीवाडीत लोकांचे अनेक प्रश्न आहेत. भाजपा सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सोडविण्यात आले पाहिजेत. लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घ्या, अशा सूचना माजी आमदार प्रमोद जठार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केल्या.येथील हॉटेल महाराजा येथे नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, काका कुडाळकर, विलास हडकर, राजू राऊळ, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, आबा तारी, जनार्दन सावंत आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना जठार म्हणाले, तुम्हाला विश्वास देण्यासाठी आम्ही सर्वजण याठिकाणी आलो आहोत. तुम्ही आता बलाढ्य सरकारचे कार्यकर्ते असल्याने तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही आता सरकार असल्याने तुम्हाला आता राज्य करायचे आहे. सरकारची पावले प्रत्येक वाडीवस्तीत उमटविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्याचे जाळे निर्माण झाले पाहिजे. यापूर्वी राज्यात युतीचे सरकार होते तेव्हा सत्तेत आमचा फक्त ४० टक्के वाटा होता. आता शत प्रतिशत भाजपाचे सरकार असल्याने शत प्रतिशत पदे भाजपच्याच कार्यकर्त्यांना मिळणार आहेत. जिल्ह्यात आपली ताकद कमी आहे. येथे आपला एकही आमदार निवडून आलेला नसला तरीही सत्तेची अशी संधी यापूर्वी कधीही आली नव्हती. पक्षवाढीसाठी हीच वेळ असून कामाला लागा. लवकरच जिल्ह्यात भाजपाचा पालकमंत्री ठरणार असल्याचेही जठार म्हणाले.जनता दरबारात नागरिकांनी सीआरझेडचा प्रश्न, आचरा येथील देवस्थान इनाम जमिनी, सवलतीच्या दरात केरोसिन, अनधिकृत पर्ससीन, गौण खनिज याबाबत प्रश्न मांडले. मुंबईऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक व्हावे या जठार यांच्या मागणीचेही यावेळी त्यांना स्मरण करून देण्यात आले. (प्रतिनिधी)मालवण येथील हॉटेल महाराजा येथे नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतुल काळसेकर, राजन तेली, काका कुडाळकर आदी उपस्थित होते.