शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्ह

By admin | Updated: February 26, 2016 00:20 IST

नाडकर्णी, जाधव, परब यांचा समावेश : दोडामार्ग बसस्थानक कामात अडथळाप्रकरणी कारवाई े

दोडामार्ग : येथील बसस्थानकाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामे दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जमाव करून बंद पाडली होती. त्याप्रकरणी पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग कणकवली विभागातील कनिष्ठ अभियंता सुरेश पांडुरंग बिले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकणी, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई, काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, माजी सभापती दयानंद धाऊसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस आदींसह पंधरा जणांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरकायदा बेकायदा जमाव करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते येथील बसस्थानकाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम जाहीर झाल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामे पूर्ण करूनच उद्घाटन करा अन्यथा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा दिला होता. तसेच कधी अधिकाऱ्यांना घेराव घालून तर कधी ठिय्या धरून बसस्थानकाची सुरू असलेली कामे बंद पाडली होती. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना वेळेत कामे पूर्ण करण्यात अडचण आली. त्या पार्श्वभूमीवर महामंडळ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार बिले यांनी पंधरा जणांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी तपास करीत आहेत.