शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मौदे येथील ह्यत्याह्ण युवकावर अखेर अंत्यसंस्कार; पोलिसांनी समजविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 17:49 IST

उपचार सुरु असताना बुधवारी दत्तारामचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युचे वृत्त कळताच गावातील लोक संतप्त झाले. बुधवारी रात्री उशिरा दत्तारामचा मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली जात नाही; तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली होती.

ठळक मुद्दे या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलिसांचे पथक कोल्हापूरला गेले असून दत्तारामचा शवविच्छेदन अहवाल तातडीने मिळण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

वैभववाडी : बेदम मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या मौदे येथील दत्ताराम परशुराम मोरे याच्यावर गुरुवारी (ता. ३०) रात्री पोलिसांच्या समजुतीनंतर अखेर २२ तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दत्तारामचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी अत्यंसंस्कार करण्यास नकार दिला होता. दरम्यान, अंत्यसंस्कार केले असले तरी मारहाणकर्त्यावर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीवर कुटुंबीय व ग्रामस्थ ठाम आहेत.

मौदे येथील दत्ताराम मोरे या युवकाला हेत शिवरीफाटा येथे दोघांनी मारहाण करुन उपळे खिंडीत फेकले होते. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दत्तारामला दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यानंतर त्याने घर गाठले. घरी गेल्यानंतर त्याला वेदना असह्य होऊ लागल्यामुळे स्थानिक डॉक्टरला बोलावून त्याच्यावर उपचार केले. मात्र, वेदना थांबत नसल्याने वैभववाडीत खासगी उपचार करुन त्याला कोल्हापूरला ह्यसीपीआरह्णमध्ये दाखल केले होते. उपचार सुरु असताना बुधवारी दत्तारामचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युचे वृत्त कळताच गावातील लोक संतप्त झाले. बुधवारी रात्री उशिरा दत्तारामचा मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली जात नाही; तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली होती.

पोलिसांनी ग्रामस्थांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ आपल्या भुमिकेवर ठाम होते. मात्र घरात ठेवलेल्या मृतदेहाची अवस्था पाहून रात्री उशिरा पोलिसांनी पुन्हा नातेवाईक आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच तत्काळ कारवाई करण्यात येईल. परंतु अंत्यसंस्कार वेळेत होणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी समजावले. त्यानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला. त्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलिसांचे पथक कोल्हापूरला गेले असून दत्तारामचा शवविच्छेदन अहवाल तातडीने मिळण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.संशयित मोकाटहेतमधील दोघांनी मारहाण केल्याचे दत्तारामने दुसºया दिवशी घरी गेल्यावर आईला सांगितले होते. त्यानुसार आईने त्या दोन्ही मारहाण करणाºया संशयितांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. तसेच ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीतही ह्यत्यांचीह्ण नावे आहेत. परंतु दोघे संशयित अजुनही मोकाटच आहेत. त्यामुळे मौदेत काहीतरी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणPoliceपोलिस