शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सोने चोरीसाठीच विश्वास खरेंना संपवले

By admin | Updated: January 10, 2015 00:24 IST

चोरीच्या उद्देशानेच आलो होतो. मात्र, खरे यांना आवरता न आल्याने खून झाल्याची पंचांसमक्ष कबुली दिली.

गुहागर : गुहागर येथील विश्वास खरे खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना शुक्रवारी गुहागरात आणण्यात आले. हे तिघेही तिशीतील आहेत. पंचांसमक्ष आणि प्रत्यक्ष घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर आरोपींनी दि. १ आॅक्टोबर २०१४ रोजी घडलेला घटनाक्रम उलगडला. केवळ सोने चोरीच्या उद्देशानेच आलो होतो. मात्र, खरे यांना आवरता न आल्याने खून झाल्याची पंचांसमक्ष कबुली दिली. या आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता दि. १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कासवमित्र विश्वास खरे यांचा १ नोव्हेंबर २०१४ रोजी धारदार शस्त्राने असंख्य वार करुन निर्घृण खून करण्यात आला होता. सुरुवातीला गुहागर पोलीस आणि नंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांच्यामार्फत याप्रकरणी तपास सुरु होता. पोलीस निरीक्षक एस. एन. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथून तीन संशयितांना ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांना गुहागरला आणण्यात आले आणि पंचांसमक्ष त्यांचा कबुलीजबाब नोंदवण्यात आला. संशयित आरोपींपैकी एकाला घटनास्थळी नेण्यात आले.या आरोपीतील एकजण जो ड्रायव्हर आहे. काही दिवसांपूर्वी गुहागरमध्ये भाडे घेऊन आला होता. यावेळी त्याने विश्वास खरे यांचे खरे ‘प्लेझर पॉर्इंट’ हे निर्जनस्थळी असल्याचे व खरे यांच्या अंगावर नेहमी लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याचे हेरले होते. दरम्यान, पुणे येथे परतल्यानंतर आर्थिक चणचणीत असलेल्या आपल्या दोघा साथीदारांना ही बाब सांगितली. त्यानंतर प्रत्यक्ष घटनेपूर्वी हे तिघेही गुहागरात खरे यांच्याकडे राहून गेले होते. त्यानंतर दागिने लुटण्याच्या मनसुब्याने दि. ३० सप्टेंबर रोजी ते पुन्हा गुहागर येथे आले. खरे यांच्या रिसॉर्टच्या अलिकडे सुमारे ७०० मीटर अंतरावरील दुर्गादेवीच्या खांबाजवळील दातार यांच्या घराच्या अंगणात त्यांनी आपली दुचाकी उभी केली. समुद्र किनाऱ्यावरील एकांत ठिकाणी असलेल्या रुमचे दार उघडून राहिले. दुसऱ्या दिवशी खरे यांनी त्यांना याबाबत सुनावले. आगाऊ भाडे देण्यावरुन किरकोळ कुरबूरही झाली. त्यानंतर खरे यांच्यावर सुरा रोखून अंगावरील दागिने काढून देण्यास धमकावले. त्यांच्या पोटात सुऱ्याने वार केला. तरीही बधत नसल्याने फडक्याने तोंड दाबून तिथेच पडलेल्या विळ्यासारख्या शस्त्राने एकाने खरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर पलायन केले. हा घटनाक्रम त्यांनी पंचांसमोर कथन केला. (वार्ताहर)गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांकडून मोबाईल टेक्नॉलॉजीतील एका वरिष्ठ तज्ज्ञाचे सहकार्य घेण्यात आले. मोबाईल टॉवर ट्रेसिंगमुळे तिघा संशयितांपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले.