शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

संत तुकाराम वनग्राम योजनेतून साधणार पर्यावरण संतुलन

By admin | Updated: February 27, 2015 23:18 IST

कामकाजाबद्दल समाधान : शिवाजीनगर ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय समितीची भेट, आता शिवाजीनगर राज्याच्या शर्यतीत

शिवाजी गोरे-दापोली -शासनाने पर्यावरण समतोल व वनरक्षण करण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजना २००६ पासून राज्यात लागूकेली ११७९९ गावामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन करुन या योजनेचे काम सुरू झाले. संत तुकाराम महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या या योजनेचे सकारात्मक पडसाद पडायला लागले असून दापोली तालुक्यातील शिवाजीनगर ग्रामपंचायतीने संत तुकाराम वन ग्राम योजनेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. या गावाला काल राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने भेट दिली असता, या योजनेचे सकारात्मक कामे दिसून आली आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय पुरस्काराच्या शर्यतीत शिवाजीनगर असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य मूल्यमापन समितीचे अध्यक्ष एस. आर. बाबर, ए. जी. जमदाडे, विभागीय वनाधिकारी मूल्यांकन एस. जी. लडखत, उपसंचालक सामाजिक वनीकरण, तुकाराम साळुंखे मुख्य वनसंरक्षक कार्य आयोजन पुणे या कमिटीने शिवाजीनगर गावाला भेट दिली असून, शिवाजीनगर ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची पाहणी केली. गावाने लोक सहभागामुळे श्रमदान केलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. या पाहणीत शिवाजीनगरचे काम उत्कष्ट असल्याचे मूल्यमापन समितीच्या निदर्शनास आले असून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर शिवाजीनगर ग्रामपंचायत आता राज्यस्तरीय बक्षीस घेण्यासाठी सज्ज झाली आहे.शिवाजीनगर ग्रामपंचायतीच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीने वनीकरण, मृद व जलसंधारण, वनसंरक्षण, वनामध्ये अवैध चराई प्रतिबंध वन्य पशु पक्षी संरक्षण, वन्य प्राणी-पक्षी यांना पाणवठा, श्रमदान, लोकसहभाग, इंधनाचा वापर आदी अटी पूर्ण केल्या आहेत.वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पत्की यांचे मार्गदर्शनाखाली संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे आनंदा हिरडीकर वनपाल अनिल दळवी, वनरक्षक, वन व्यवस्थापन अध्यक्ष संजय महाडिक, चंद्रकांत सावंत, अशोक पवार सरपंच, राजेंद्र भोळे, तंटामुक्त अध्यक्ष सुधीर माने, दीपक कुंबेरे, राजेंद्र पवार, चंद्रकांत राणे, रमेश पंदेरे यांनी काम केले.‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून वने व वन्यजीव यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या संत तुकाराम महाराज यांच्या नावाने संत तुकाराम वनग्राम योजना शासनाने सुरु केली असून, या योजनेंतर्गत ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या भाग घेतील त्यामधून जिल्हास्तरावरील उत्कृष्ट ठरणाऱ्या ३ समित्यांना अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरे बक्षीस दिले जाते. जिल्हास्तरावरील बक्षीसपात्र वनव्यवस्थापन समितीतून राज्यासाठी मूल्यमापन केले जाते. राज्यस्तरावरील ३ उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट राज्यस्तरीय संयुक्त वनव्यवस्थापन समिती पारितोषिक प्रदान करण्यात येतो. प्रथम १० लाख, द्वितीय ५ लाख, तृतीय ३ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते.बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून शिवाजीनगर गावाने गावातील विहिरीला बंदिस्त जाळी बसवून बिबट्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.