शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

९९ अंगणवाड्या होणार हायटेक, जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:53 AM

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन मंडळमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९९ अंगणवाडी केंद्रांन डिजिटल बनविण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या ...

ठळक मुद्दे९९ अंगणवाड्या होणार हायटेक, जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर महिला व बालकल्याण समिती सभेत  माहिती

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन मंडळमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९९ अंगणवाडी केंद्रांन डिजिटल बनविण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या अंगणवाड्या हायटेक होणार आहेत, अशी माहिती गुरुवारी झालेल्या महिला व बाल कल्याण समिती सभेत देण्यात आली.सभापती पल्लवी राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात झालेल्या या सभेला प्रभारी अधिकारी विनीत म्हात्रे, सदस्य माधवी बांदेकर, सायली सावंत, श्वेता कोरगावकर, वर्षा कुडाळकर, पल्लवी झिमाळ, शर्वरी गांवकर यांसह तालुका प्रकल्प अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.डिजिटलसाठी मंजूर झालेल्या ९९ अंगणवाडी केंद्रांसाठी कुडाळ, कणकवली तालुक्यांमधून प्रत्येकी १३ तर मालवण, देवगड, वेंगुर्ले, दोडामार्ग व वैभववाडी या पाच तालुक्यांतून प्रत्येकी १२ अंगणवाडी केंद्र निवडण्यात येणार आहेत. या सुविधेसाठी अंगणवाडीला स्वत:ची इमारत, शौचालय व अन्य सुविधा असणे बंधनकारक आहे. अशा अंगणवाडी केंद्रांचा शोध घेऊन यादी तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या सभेत महिला व बाल विकास विभागाच्या महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आधारभूत किंमती निश्चित करण्यात आल्या. सायकल ३८०० रुपये, घरघंटी १२ हजार ६०० रुपये, शिलाई मशीन ५३२५ रुपये, एमएससीआयटी ३५०० रुपये, फॅशन डिझायनिंग ३५०० रूपये, फळ प्रक्रिया ३३०० रूपये, ब्युटी पार्लर ३००० रूपये अशा प्रकारे प्रतिलाभार्थी अनुदान निश्चित करण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारsindhudurgसिंधुदुर्ग