शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपसरपंचांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: August 6, 2015 23:18 IST

इन्सुलीतील घटना : पंचक्रोशीत शोक

बांदा : सावंतवाडी तालुका पाणलोट सचिव समितीचे अध्यक्ष व इन्सुलीचे माजी उपसरपंच प्रसाद ऊर्फ बंड्या नामदेव पालव (वय ३५, रा. इन्सुली-डोबाशेळ) यांचा बुधवारी सायंकाळच्या सुमारास बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी स्थानिकांनी बंधाऱ्याच्या पाण्यात शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. इन्सुली पाणलोट समितीचे सचिव म्हणून ते कार्यभार पाहत होते. बुधवारी इन्सुली परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने पाणलोट समितीच्यावतीने इन्सुली-आंब्याचे गाळू येथे बांधण्यात आलेला बंधारा ओव्हर फ्लो झाला होता. या बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी ते सायंकाळी त्याठिकाणी गेले होते. बंधाऱ्यावरून पाहणी करताना त्यांचा पाय घसरल्याने ते बंधाऱ्यात कोसळले. बंधारा तब्बल पंधरा ते वीस फूट खोल असल्याने तसेच तुडुंब भरला असल्याने ते बंधाऱ्याच्या पाण्यात गटांगळया खाऊ लागले. याठिकाणी वस्ती नसल्याने प्रसाद पालव हे बंधाऱ्याच्या पाण्यात बुडाल्याचे प्रथम कोणाला समजले नाही.प्रसाद पालव यांची मोटारसायकल बंधाऱ्यावर असल्याचे काही युवकांनी पाहिले. त्यानंतर ते पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर बंधाऱ्याच्या पाण्यात शोधाशोध करण्यात आली. गुरुवारी पहाटे सहा वाजता त्यांचा मृतदेह सापडला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत करिहोळी यांनी शवविच्छेदन केले.प्रसाद पालव हे समाजकार्यात नेहमीच सक्रिय असायचे. काँग्रेसचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी अडीच वर्षे उपसरपंचपद भूषविले. दोन दिवसांपूर्वीचत्यांनी पदभार सोडला होता. उपसरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ जनतेला करून दिला होता. गुरुवारी सकाळी बंधाऱ्यात मृतदेह शोध मोहिमेत गावातील विकी केरकर, बाबू तावडे, अरुण पालव, स्वागत नाटेकर, महेंद्र्र सावंत, महेंद्र पालव, दीपक सावंत, सुनील सावंत, मिलिंद राऊळ, शिवाजी सावंत, पुरुषोत्तम सावंत, संजय पालव यांनी सहभाग घेतला. शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, पंचायत समिती सदस्य बबन राणे, माजी सरपंच नीता राणे यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महेंद्र पालव यांनी बांदा पोलीस ठाण्यात माहिती दिली, असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रसाद पालव यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहीण, वहिनी असा परिवार आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नंदू पालव यांचे ते कनिष्ठ बंधू होत. (प्रतिनिधी)अणसूर येथील महिलेचा नदीत बुडून मृत्यूवेंगुर्ले : अणसूर येथील द्रौपदी अर्जुन गावडे (वय ८०) या वृद्ध महिलेचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही महिला सकाळी ९ वाजता नदीकडे प्रात:विधीला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. परंतु, दुपारी दीड वाजेपर्यंत ती न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दुपारी अडीचच्या सुमारास तिचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. याबाबत तिचा मुलगा बाळकृष्ण अर्जुन गावडे याने पोलिसांत माहिती दिली.