शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

डबल डेकर ट्रेनची चाचपणी सुरू कोकणवासीयांना मिळाला दिलासा : रेल्वे प्रशासनाने घेतली दखल

By admin | Updated: May 19, 2014 00:33 IST

सावंतवाडी : दिवा- सावंतवाडी रेल्वेला रोह्यात भीषण अपघात झाल्यानंतर आता रेल्वेने विशेष खबरदारी घेण्यात सुरुवात केली आहे. त्यानुसार या मार्गावर

 सावंतवाडी : दिवा- सावंतवाडी रेल्वेला रोह्यात भीषण अपघात झाल्यानंतर आता रेल्वेने विशेष खबरदारी घेण्यात सुरुवात केली आहे. त्यानुसार या मार्गावर कमीत कमी गाड्यांमधून जास्तीत जास्त प्रवासी नेण्याच्या इराद्याने आता प्रथमच डबल डेकर रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगाची चाचणी शनिवारपासून सुरू झाली. ही रेल्वे रविवारी सावंतवाडीतील मळगाव स्थानकावर दुपारी दाखल झाली. परंतु न थांबताच पुढे निघून गेली. मुंबई- मडगाव मार्गावर प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत असते. कोकणची रेल्वे कोकणी माणसासाठी नाही, अशी नेहमी ओरड होत असते. त्यामुळे कोकण रेल्वे कॉपोरशनने पुढाकार घेत आता नवीन डबल डेकर ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनचा फायदा मोठ्या प्रमाणात कोकणवासीयांना होणार आहे. अनेक वेळा रेल्वेत होणारी गर्दी आणि प्रवाशांच्या मागणीमुळे या मार्गावर वेळोवेळी होणार्‍या अडचणी कमी करण्यासाठी ही ट्रेन सोडण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ही ट्रेन मुंबईहून गोव्याकडे जाण्यास निघाली. शनिवारी रात्री उशिरा ती रत्नागिरीत पोचली. त्यानंतर रविवारी या रेल्वेने सिंधुदुर्गकडे प्रयाण केले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही ट्रेन सावंतवाडीतील मळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली. ताशी वीस किमी अशा वेगाने ही ट्रेन धावत होती. ही रेल्वे सोडण्यामागे फक्त या मार्गाची चाचणी हाच उद्देश असून रात्री उशिरापर्यत ही ट्रेन गोव्यात दाखल होणार आहे. याबाबत येथील रेल्वे स्थानकाच्या कर्मचार्‍यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ही डबल डेकर ट्रेन नेमकी केव्हा सुरू होणार आम्हाला माहीत नाही. पण सध्या या ट्रेनची चाचपणी सुरू असून तसा अहवाल किंवा अन्य काही असेल ते अधिकारी वरिष्ठांना देतील, असे सांगितले. (प्रतिनिधी)