दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 59 मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 02:15 PM2020-06-02T14:15:54+5:302020-06-02T14:16:45+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 59 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी देवगड तालुक्यात 11 मि.मी. पाऊस झाला आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 59 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी देवगड तालुक्यात 11 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सरासरी 27 पूर्णांक 25 मि.मी पाऊस झाला असून तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पासाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 59(85), सावंतवाडी 29(54), वेंगुर्ला 16(30.6), कुडाळ 31(33), मालवण 32(37), कणकवली 13(30), देवगड 11(16), वैभववाडी 27(71), असा एकूण 27.25(44.575) मि.मी पाऊस झाला आहे.
अरूणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 37.60 मि.मी. पाऊस
अरुणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 37.60 मि.मी. पाऊस झाला आहे. तर देवघर प्रकल्प क्षेत्रात 25 मि.मी आणि कोर्ले-सातंडी क्षेत्रात 7 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्याताली मोठ्या, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढील प्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 217.0200 द.ल.घ.मी पाणी साठा आहे. सध्या तिलारी प्रकल्प 48.51 टक्के भरलेला आहे.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 26.7040, अरुणा झ्र 18.4600, कोर्ले- सातंडी झ्र 22.3200. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढील प्रमाणे झ्र शिवडाव झ्र 1.0022, नाधवडे झ्र 1.8346, ओटाव झ्र 1.6605, देंदोनवाडी झ्र 0.2307, तरंदळे झ्र 0.8410, आडेली झ्र 0.160, आंबोली झ्र 0.2950, चोरगेवाडी झ्र 0.6150, हातेरी झ्र 0.2220, माडखोल झ्र 0.9880, निळेली झ्र 0.3190, ओरोस बुद्रुक झ्र 0.4790, सनमटेंब झ्र 0.4460, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.2220, दाभाचीवाडी झ्र 0.5250, पावशी झ्र 0.7240, शिरवल झ्र 0.4400, पुळास झ्र 0.1190, वाफोली झ्र 0.0180, कारीवडे झ्र 0.1160, धामापूर झ्र 0.4710, हरकूळ झ्र 0.4260, ओसरगाव झ्र 0.0180, ओझरम झ्र 0.4240, पोईप झ्र 0.0, शिरगाव झ्र 0.250, तिथवली झ्र 0.3980, लोरे झ्र 0.0560