शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

देवगडात दूरध्वनी सेवेचा बोजवारा

By admin | Updated: August 16, 2015 21:53 IST

दूरसंचार विभागाला निवेदन : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नंदूशेठ घाटे यांचा इशारा

देवगड : अपुरे कर्मचारी, साहित्याचा तुटवडा तसेच अधिकाऱ्यांची उदासीनतेमुळे देवगड तालुक्यातील दूरध्वनी सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे. दूरसंचार निगमने याकडे लक्ष घालून तालुक्यातील दूरध्वनी सेवा सुरळीत करून ग्राहकांना चांगली सेवा द्यावी, असे टेलिफोन विभागाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदूशेठ घाटे यांनी असे निवेदन दिले आहे. देवगड टेलिफोन एक्स्चेंजमध्ये नंदूशेठ घाटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले. यावेळी पंचायत समितीे सदस्य प्रकाश गुरव, अभय बापट, ग्रामपंचायत सदस्य अभय कुळकर्णी, ढोके, शिवानंद पेडणेकर, रामानंद वाळके, बंटी कदम, विनायक जोईल, सुधीर मांजरेकर, आदी उपस्थित होते. मुंबई - गोवा महामार्गापासून ४० किलोमीटर आत असलेल्या देवगड तालुक्यात अधिकारी काम करायला येत नाही. त्यामुळे आॅफिस कामांसाठी व फिल्डवरील कामांसाठी कंत्राटी कामगारांवर अवलंबून रहावे लागते. साहित्याचा तुटवडा असल्याने इच्छा असूनही कर्मचाऱ्यांना जनतेच्या समस्या सोडविता येत नाहीत. याचा फटका कंत्राटी कर्मचाऱ्याला बसतो व ग्राहकांच्या रोषाला त्याला बळी पडावे लागते. कारण ग्रामीण भागातील जनता ही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. याचा परिणाम म्हणून बहुतांश लोक हे या सेवेपासून दूर होत आहेत. सर्व बाबींमध्ये सामान्य ग्राहकांचा दोष काय? कार्यालयाकडून बिल वेळेवर भरले नाही तर सेवा तत्काळ खंडित करता. मग वेळेवर बिले अदा केल्यानंतर सेवा नियमित व अखंडितपणे देणे कर्तव्य नाही का? या बाबींचा विचार करून दूरध्वनी सेवा तत्काळ सुरळीत करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चा काढून जाब विचारण्यात येईल. (प्रतिनिधी)अपुरे कर्मचारी, साहित्याचा तुटवडादेवगड तालुक्यात १९ सबस्टेशनपैकी ७ ठिकाणी लाईनमन आहेत व उरलेल्या १२ ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच सर्व कारभार अवलंबून आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधनही मिळत नाही. तालुक्यातील १९ सबस्टेशनला प्रत्येकी २ याप्रमाणे ३८ बॅटऱ्यांची गरज आहे. पण; बहुतांश ठिकाणी बॅटऱ्या उपलब्ध नसल्याने वीज गेली की, फोन सेवा बंद होते, व त्यावेळी ग्राहकांची गैरसोय होते. देवगड तालुक्यात सी.डी.एम.ए. तरंग सेवा ही फक्त नावालाच कार्यरत आहे, असे दिसते. कारण बहुतांश ठिकाणी ही सेवा बंदच आहे. बंद झाल्यास त्याची दुरुस्तीसुद्धा मुख्य कार्यालयात होत नाही.लाईट गेल्यावर काही वेळेला मोबाईल टॉवरही बंद होतात; पण इतर खासगी सेवा सुरळीतपणे चालू आहेत.