शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य

By admin | Updated: September 12, 2014 23:51 IST

वेंगुर्लेतील 'त्या' सात नगरसेवकांची स्पष्टोक्ती

वेंगुर्ले : सातही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या विरोधात कोणतेही काम केलेले नाही. यापुढेही पक्षश्रे्रष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे मत राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तर जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयाविरोधात आपण स्टे घेणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हॉस्पिटल नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका संपर्क कार्यालयात माजी नगराध्यक्ष, नगरसेविका डॉ. पूजा कर्पे, नम्रता कुबल, गटनेते वामन कांबळे, मनीष परब, अवधूत वेंगुर्लेकर, फिलोमिना कार्डोज, शैलेश गावडे यांच्यासह तालुकाध्यक्ष अ‍ॅन्थोनी डिसोजा व जिल्हा बँक संचालक नितीन कुबल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी माहिती देताना नगरसेवक म्हणाले की, ९ जुलै २०१३ रोजी पक्षनिरीक्षक किरण पावसकर यांनी कुडाळ येथे बोलाविलेल्या बैठकीच्या अजेंड्यावर वेंगुर्ले नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकीसंदर्भात असा कोणताही उल्लेख नव्हता. आतापर्यंत आम्ही सातही नगरसेवक पक्षाचे सर्व आदेश पाळत आलो आहोत. अलीकडेच झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळीही पक्षनिरीक्षक किरण पावसकर यांच्या सुचनेनुसार आम्ही प्रसन्ना कुबल यांना कोणताही विरोध न करता बिनविरोध निवडून दिले आहे. असे असूनही फुटीर नगरसेवक म्हणून आमच्यावर शिक्का मारला जात आहे, तो चुकीचा आहे. आम्ही पक्षविरोधी कोणतीच कारवाई केली नाही. याउलट त्या पाच नगरसेवकांनी केसरकर यांच्याबरोबर राहून सेनेचा प्रचारही नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत केला होता. त्यामुळे तेच खरे फु टीर आहेत. बाराही नगरसेवकांवर जी कारवाई झाली, त्यात दीपक केसरकर हेच जबाबदार आहेत. बाराही नगरसेवक निलंबित ठेवून नगरपरिषद बरखास्त झाल्यास त्यांना पुन्हा आपला वरचष्मा दाखवायचा आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)