शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सुईणींना गौरविण्याचा निर्णय : कदम

By admin | Updated: July 24, 2015 00:43 IST

आज सिजरिंगचे प्रमाण वाढले आहे. तरीही सुईणींचे महत्त्व कमी झालेले नाही

दापोली : सुईण हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. आई व बाळाची काळजी घेणारी ‘सुईण’ आजही शासन दरबारी दुर्लक्षित आहे. सुईणीच्या कामाचे सामाजिक योगदान लक्षात घेऊन साडी देऊन त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घेतला आहे. यापुढे समाजातील दुर्लक्षित घटकाला सन्मानाने जगता यावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे दापोलीचे आमदार संजय कदम म्हणाले. दापोली तालुक्यातील १४ सुईणींचा शाल, श्रीफळ, साडी देऊन सन्मान करण्यात आला. स्त्री गरोदर असल्यापासून तर ती प्रसुत झाल्यावर स्त्री व बाळाची सुखरूपपणे नि:स्वार्थीपणे काळजी घेणारी सुईण असते. त्या सुईणीला समाजाकडून कसल्याही अपेक्षा नाहीत. आजच्या आधुनिक काळात सुईणीचे महत्व कमी झालेले नाही. डॉक्टरचे सर्व प्रयत्न संपतात. परंतु सुईण आपले प्रयत्न सोडत नाही. त्या स्त्रीची नैसर्गिक प्रसुती करुन दोन जीव वाचवण्याचे महान कार्य सुईणींकडून होत आहे. आज सिजरिंगचे प्रमाण वाढले आहे. तरीही सुईणींचे महत्त्व कमी झालेले नाही. शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या घटकाला समाजाकडून सन्मानाची वागणूक मिळावी. सरकारकडून त्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन दरबारी आवाज उठविणार असल्याचे आमदार कदम म्हणाले. यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)