शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांमध्ये वाद जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : समाजकल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 00:20 IST

विभागाकडून वैभववाडीवर अन्याय झाल्याचा चोरगेंचा आरोप

सिंधुदुर्गनगरी : घरदुरूस्ती व वृद्ध कलाकार मानधन प्रस्ताव मंजुरीला समाजकल्याण विभागाने वैभववाडी तालुक्याला डावलले असल्याचे माजी महिला व बालविकास सभापती स्नेहलता चोरगे यांनी सांगितले. ‘समाजकल्याण’ने वैभववाडीला एक पैसाही दिला नसल्याचा सनसनाटी आरोप केला. या विधानामुळे आक्रमक बनलेल्या समाजकल्याण सभापतींनीही पलटवार करत, तुम्ही पण सभापती होता. विविध प्रस्ताव मंजूर करण्याची जबाबदारीही तुमची होती, असे असताना तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, असे सुनावले. आजच्या सभेत आजी व माजी सभापतींमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वाद चांगलेच रंगले.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिवाजी महाराज सभागृहात गुरूवारी झाली. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, रत्नप्रभा वळंजू, आत्माराम पालेकर, दिलीप रावराणे, दिलीप रावराणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, समिती सदस्य संदेश सावंत, रणजित देसाई, सदाशिव ओगले, निकिता जाधव, स्नेहलता चोरगे आदी उपस्थित हाते.आजच्या सभेत विषय समिती व उपाध्यक्षांना अध्यक्षांनी खातेवाटप केले. त्यानुसार उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांना पशुसंवर्धन, दुग्धशाळा व कृषी सभापती, दिलीप रावराणे यांना वित्त व बांधकाम तर आत्माराम पालेकर यांना शिक्षण व आरोग्य सभापती पदाची जबाबदारी देत खातेवाटप करण्यात आले. जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग हा वैभववाडी तालुक्यावर अन्याय करत असून या विभागामार्फत घरदुरूस्तीबाबतचा एकही प्रस्ताव या विभागाकडून मंजूर केला गेला नाही. वृद्ध कलाकार मानधनाच्या ६0 प्रस्तावांमध्ये वैभववाडीतून केवळ चारच प्रस्ताव मंजूर केले. यासह अनेक प्रश्नांचा भडीमार माजी सभापती स्नेहलता चोरगे यांनी केला. यावर समाजकल्याण सभापती अंकुश जाधव आणि चोरगे यांच्या शाब्दीक युद्ध रंगले. सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीच्या जागेच्या मुद्दाचा विषय गुरूवारी सभागृहात रंगला. पंचायत समितीच्या बांधकामासाठी भटवाडी येथे जागा निश्चितीचा ठराव घेऊनही पालकमंत्र्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे जागेचा प्रश्न सुटत नाही. पालकमंत्र्यांना पंचायत समितीची इमारत सावंतवाडी प्रांत कार्यालयानजिक हवी असून त्याला आमचा पूर्णपणे विरोध असल्याची भूमिका काँग्रेसच्या सत्ताधारी सदस्यांनी घेतली. या इमारतीसाठी २ कोटी १५ लाखाचा निधीही शासनाने मंजूर केला असल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्री जागा सुचविणारे कोण? असे सदस्य रणजीत देसाई आणि संदेश सावंत यांनी सांगत नूतन इमारत ही भटवाडीतच होणार असल्याचा पवित्रा घेतला. सावंतवाडी पंचायत समितीची इमारत भटवाडी येथे होण्याच्यादृष्टीने प्रस्ताव तयार करा व तो वास्तुविशारदकडे पाठवा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी सभागृहाला दिले. (प्रतिनिधी)सदाशिव ओगले : वीज कंपनीमुळे आग लागल्यास मदत मिळावीवीजतारा एकमेकांना स्पर्श झाल्यास त्यातून पडलेल्या आगीच्या ठिणगीमुळे माळरानावर वणवा पेटून लाखो, करोडो रूपयांची काजू, आंब्याची कलमे जळून खाक होतात. यातून शेतकरी भरडला जात असल्याचे सांगत यांना महावितरणकडून कोणतीच मदत दिली जात नाही, असे सदाशिव ओगले यांनी सभागृहात मांडले. त्यांना मदत मिळावी, अशी मागणी केली. यापुढे असे प्रकार घडल्यास संबंधितांना आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी सभागृहात सांगितले.माकडांमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे नुकसान होते. यात आंबा, केळी, काजू, चिकू, नारळ, ऊस पिकांची नासधूस माकडांकडून होते. त्यांना आवरणे आता गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत यासाठी वेगळा निधी देण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.शेतकऱ्यांना मिळणार माफक दरात सेवा३0 कोटीचे बजेट मंजुरीसाठीसर्वशिक्षा विभागाने शासनाकडे विविध विकास कामांवर खर्च करण्यासाठी ३0 कोटी २५ लाखाचे बजेट तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अशी माहिती देण्यात आली.