शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षातच दापोली तालुका ‘मोबाईल हब’

By admin | Updated: July 14, 2015 21:47 IST

ट्रायचे सर्वेक्षण : सध्या अडीच ते तीन लाख लोकांच्या हाती मोबाईल

दापोली : दापोलीकरांची अनेक वर्षांची मागणी फळाला आली व १२ जुलै २००४ रोजी दापोली शहरात बीएसएनएलच्या मोबाईलची पहिली अधिकृत ट्रिंग ट्रिंग वाजली. याआधी दापोली शहरात कोणत्याही मोबाईल कंपनीची सेवा नव्हती. या घटनेला याच महिल्यात तब्बल दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या दहा वर्षात दापोलीही मोबाईल हब झाल्याचे चित्र ट्रायच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.ट्रायच्या आकडेवारीनुसार दापोली तालुक्यात सध्या अडीच ते तीन लाख मोबाईल ग्राहक आहेत. १२ जुलै २००४ हा दिवस दापोलीकरांकरिता मैलाचा दगड ठरला. या दिवशी दापोली शहरात अनेक दिवसांपासून उभ्या असणाऱ्या परंतु रेंज नसल्याने कार्यान्वित नसणारा गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिरसमोरील टॉवर सायंकाळच्या सुमारास अचानक कार्यान्वित करण्यात आला. यामुळे ज्यांचे मुंबई, पुणे, रत्नागिरी व अन्य मोठ्या शहरांत जाणे-येणे होते व यामुळे ज्यांच्याकडे बीएसएनएल किंंवा एमटीएनएलचे सीमकार्ड असणारे मोबाईल होते, ते अचानक खणखणायला लागले. यामुळे अनेकांनी सीमकार्डकरिता बीएसएनएलच्या कार्यालयात धाव घेतली. ज्यादिवशी बीएसएनएलने दापोली कार्यालयातून आपल्या पहिल्या सीमकार्डचे वितरण केले, त्या दिवशी पहाटेपासून बीएसएनएलच्या कार्यालयात रांगा लागल्या. काहीजण रात्रीपासून या कार्यालयाच्या पायरीवर सीमकार्डकरिता येऊन झोपले होते.दापोली बीएसएनएलच्या इतिहासात पहिल्या दिवशी वितरित झालेल्या पहिल्या सीमकार्डचा नंबर ९४२२०५४१६१ होता.बीएसएनएलनंतर टाटा, आयडिया, एअरटेल आणि २००६ साली वोडाफोन, त्याच्या पश्चात रिलायन्स, डोकोमो व युनिनॉर आदी कंपन्यांचे दापोलीत आगमन झाले. आज ट्रायच्या नोंदणीनुसार दापोली शहराची लोकसंख्या ५१ हजार आहे. या ५१ हजारात दापोली शहरात वोडाफोनचे ७, बीएसएनएलचे ६, आयडियाचे ४ व टाटाचे ३ टॉवर अहोरात्र दापोलीकरांना सेवा देतात. दापोलीत १२ जुलै २००४पूर्वी ज्यांनी मोबाईल विकत घेतले होते व ज्यांनी दुसऱ्या शहरांतून सीमकार्ड मिळवली होती, त्यांना दापोली शहरात रेंज मिळत नव्हती. मग हे मोबाईलप्रेमी त्यांच्या सवडीने दापोलीच्या पश्चिमेला चंद्रनगर गावाच्या हद्दीवर असणाऱ्या डोंगरांवर जात असत. याठिकाणी खेड तालुक्यातील कशेडी येथील टॉवरची रेंज मिळत असे. (प्रतिनिधी)दापोलीत सध्या मोबाईल हॅन्डसेट, मोबाईल कव्हर, हेडफोन, स्क्रीनसेव्हर, रिचार्ज व्हाऊचर व अन्य मोबाईलशी संबंधित सामानाला मोठी मागणी आहे. ही मागणी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, मंडणगड, गुहागर व रायगड जिल्ह्यातील महाड शहरापेक्षादेखील अधिक आहे.-प्रसाद फाटक, मोबाईल विक्रेते, दापोली