शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक दळवी यांचा कोरोनाने मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 14:32 IST

CoronaVirus, sindhudurg, kolhapur news कणकवली तालुक्यातील कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत गोविंद दळवी (वय ५४ , रा.हरकुळ बुद्रुक, कणकवली) यांचे कोरोनाने रविवारी निधन झाले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, हलकर्णी या गावचे ते मूळ रहिवासी होते.

ठळक मुद्देशंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक दळवी यांचा कोरोनाने मृत्यू !कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, हलकर्णी येथील मूळ रहिवाासी

कणकवली : कणकवली तालुक्यातील कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत गोविंद दळवी (वय ५४ , रा.हरकुळ बुद्रुक, कणकवली) यांचे कोरोनाने रविवारी निधन झाले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, हलकर्णी या गावचे ते मूळ रहिवासी होते.कोरोनाचा संसर्ग झाल्याने हनुमंत दळवी यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आले होते.गेले आठ दिवस त्यांना ताप येत होता. त्यांना मधुमेहाचा खूप त्रास होता. कनेडी येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार त्यांनी घेतले होते.त्यानंतर कणकवलीत एक खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यासाठी गेल्यावर त्यांना कोविड तपासणी करण्यास सांगण्यात आले होते . आणखीन प्रकृती बिघडल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कोरोनामूळे रविवारी त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यातच त्यांचे निधन झाले . एक प्रामाणिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेणारे शिक्षक म्हणून ते परिचयाचे होते .शंकर महादेव विद्यालय , कुंभवडे हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची धुरा हनमंत दळवी यांनी २०१३ साली हाती घेतली. भूगोल व हिंदी हे विषय ते विद्यार्थ्यांना शिकवत असत. गेली १९ वर्षे शाळेचा शालान्त परीक्षेचा निकाल १०० टक्के ठेवण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे.त्यांच्या आकत्मिक निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .त्याच्या पश्चात  आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षकsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर