शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर काँग्रेसचा घेराओ

By admin | Updated: January 13, 2015 00:09 IST

फलकावर नावच नाही : १९ जानेवारीपर्यंत मुदत

कणकवली : येथील रेल्वेस्थानकावर रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या विविध सुविधांचा प्रारंभ कार्यक्रमाच्या नामफलकावर आमदार नीतेश राणे यांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. सोमवारी नीतेश यांच्या समर्थकांनी रेल्वेस्थानक परिसरातील रेल्वेमंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना घेराओ घालून १९ जानेवारीपर्यंत नावाचा उल्लेख न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. रेल्वेस्थानकातील रेल्वेमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील अधिकारी सुरेश बांबुळकर यांना कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी भेटून याबाबत जाब विचारला. येथील रेल्वेस्थानकात रविवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सीसीटीव्ही, वाढीव प्रवासी सुविधांतर्गत सरकत्या जिन्याच्या कामांचा प्रारंभ झाला. राजशिष्टाचारानुसार या कार्यक्रमाच्या नामफलकावर स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव टाकणे आवश्यक असताना ते जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात सावंत यांनी सबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी आमदार राणे मराठवाड्यात असल्याचे समजल्यामुळे त्यांचे नाव टाकले नसल्याचा खुलासा केला. मात्र, आमदार विजय सावंत हेही कणकवलीत नव्हते मग त्यांचे नाव का टाकण्यात आले? असे सवाल सावंत यांनी केला असता, त्याबाबत अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही. यासंदर्भात जनरल मॅनेजरना विचारावे, लागेल, असे बांबुळकर यांनी सांगिताच त्यांना येथे बोलवा, असे सतीश सावंत यांनी सुनावले. स्थानिक आमदाराचे नाव टाकण्याचे सौजन्य कोकण रेल्वेकडून हेतुपुरस्सर टाळण्यात आल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. रेल्वेने याचे कारण जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, रेल्वे प्रशासनातर्फे रविवारी रात्रीच हा नामफलक काढून टाकल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे. १९ जानेवारीपर्यंत नामफलकावर आमदार राणे यांचा नामोल्लेख न झाल्यास कॉँग्रेस रेल्वेस्थानकावर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही एका निवेदनाद्वारे दिले आहे. (प्रतिनिधी) नामफलक हटविलाआमदार नितेश राणे यांचे नाव न टाकण्यावरून वाद झाल्याने रेल्वेस्थानक परिसरात उभारलेला हा नामफलक सोमवारी रेल्वे प्रशासनाने तातडीने हटविला. दरम्यान, हा फलक रेल्वेप्रशासनाने रविवारी रात्रीच त्यांच्या गोदामात नेउन टाकल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. राजशिष्टाचारानुसार या कार्यक्रमाच्या नामफलकावर स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव टाकणे आवश्यक असताना ते जाणीवपूर्वक टाळले आहे.तसेच रेल्वेमंत्र्यांच्याच नावाचे नामफलक अडगळीत टाकणे हाही रेल्वेमंत्र्यांचा अपमान आहे. - सतिश सावंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस