शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलादेवीमध्ये ‘स्वच्छ वाडी सुंदर गाव’ अभियान

By admin | Updated: November 19, 2014 23:23 IST

गावाच्या स्वच्छतेने परिसर झळाळला : फणसगाव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

फणसगांव : देवगड तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फणसगांवच्यावतीने विठ्ठलादेवी गावामध्ये ‘स्वच्छ वाडी सुंदर गाव’ हे अभियान राबविले जात आहे. यामध्ये फणसगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी या स्वच्छता अभियानात सहभागी होऊन गावातील सार्वजनिक व धार्मिक ठिकाणांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. या स्वच्छता अभियानामुळे गावातील परिसर झळाळून निघाल्याने या अभियानाचे कौतुक होत आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’चा नारा दिला आणि देशभरात स्वच्छतेची मोहीम सुरु झाली. या अभियानाला संपूर्ण भारतभर चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच विचारांचे अनुकरण करत ग्लोबल फाऊंडेशन कुडाळ या संस्थेच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात ‘स्वच्छ वाडी, सुंदर गाव’ हे अभियान राबविले जात असून ‘शांतीमय जीवनाकरीता शिक्षण’ या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३० विद्यालयांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये फणसगांव हायस्कूलचाही सहभाग आहे. हे अभियान यशस्वीरित्या राबविणाऱ्या विद्यालयांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.फणसगांव हायस्कूलमध्ये या अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एम. आर. जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक नारकर, सरपंच ज्योती नारकर, उपसरपंच प्रशांत जठार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विश्राम नारकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण कार्लेकर, सदानंद नारकर, ग्रामपंचायत सदस्या शितल कार्लेकर, जयश्री नारकर उपस्थित होते. अभियानाच्या पहिल्या दिवशी शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी गटागटाने गावातील रस्ते, पायवाटा, पाणवठ्याची ठिकाणे, मंदिरे, शाळा, सरकारी हॉस्पिटल, बस थांबा परिसर स्वच्छता करण्यात आली. अभियानामध्ये ग्रामस्थांना सहभागी करत अभियान यशस्वीरित्या राबविले जाईल. या अभियानाची सर्वत्र जनजागृती केली जाईल. तसेच हे अभियान राबविताना बक्षीस मिळविणे हा हेतू नसून यापुढेही दर शनिवारी किंवा रविवारी प्रत्येक वाडीमध्ये स्वच्छता अभियान निरंतर चालू ठेवून आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावांची स्वच्छता करणार असल्याचे प्राचार्य एम. आर. जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. (वार्ताहर)