शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचा १ लाख बालकांना मिळणार लाभ

By admin | Updated: January 10, 2015 00:23 IST

पल्स पोलिओ : जिल्ह्यात ४ हजार कर्मचारी सज्ज, १८ जानेवारी आणि २२ फेब्रुवारीला मोहीम

रत्नागिरी : जिल्ह्यात दि. १८ जानेवारी व २२ फेब्रुवारी रोजीच्या पल्स पोलिओ लसीकरणाचा लाभ जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ४८५ एवढ्या ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यात शहरी भागामध्ये १३१ व ग्रामीण भागामध्ये १८२७ अशी एकूण १९५८ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी एकूण ४,३०५ कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नियुक्ती करण्यात आली असून, १२५ वाहने या मोहीमेसाठी अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत.बसस्थानक, रेल्वे स्थानक येथेही पोलिओ लसीकरणाची मोफत सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी १४९ ट्रान्झीट टीम तसेच १५५ मोबाईल टीम तैनात करण्यात आल्या आहेत. ही मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी जिल्हा, तालुका व गावपातळीवर समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी तसेच लसीकरण केंद्रावरील कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेमध्ये एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही. यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्व इतर संस्थांचा सहभाग व सहकार्य अपेक्षित आहे. त्यासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब, आय. एम. ए., नेहरु युवा केंद्र, आकाशवाणी जिल्हा माहिती कार्यालय, शिक्षण विभाग यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज झाली आहे. आपल्या कुटुंबातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्वांना दिनांक १८ जानेवारी व २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पोलिओ डोस पाजून घ्या, बाळ आजारी असले तरी किंवा यापूर्वी पोलिओ डोस दिला असला तरीही पोलिओ डोस पाजून घ्यावा, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके यांनी केले आहे.ही मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, प्रसिद्धी माध्यम यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळम, आरोग्य समिती सभापती डॉ. अनिल शिगवण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके यांनी केले आहे. (प्रतिनिधी)