आंबोलीत दारूचे टेम्पो पकडल

By Admin | Updated: November 28, 2014 23:41 IST2014-11-28T22:51:23+5:302014-11-28T23:41:55+5:30

ग्रामस्थ आक्रमक : ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त; चालक फरारे

Ampolt caught the tempo of alcohol | आंबोलीत दारूचे टेम्पो पकडल

आंबोलीत दारूचे टेम्पो पकडल

आंबोली/ इन्सुली : मध्यरात्रीपासून आंबोलीतील बसस्थानक परिसरात दारूने भरलेले दोन टेम्पो उभे असल्याचा संशय ग्रामस्थांना आल्यानंतर त्यांनी याबाबतची कल्पना उत्पादन शुल्क विभागाला देऊनही त्यांनी त्यातील एक गाडी सोडली. ग्रामस्थांना ही कृती संशयास्पद वाटली. त्यानंतर उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दोन टेम्पो पकडले आहेत. या कारवाईत टेम्पोसह ३६ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यात २६ लाख ८८ हजार रुपयांची दारू आणि १0 लाख रुपये किमतीचे दोन टेम्पो ताब्यात घेतले. मात्र, गाडीचालक व मालक फरार झाले आहेत.
आंबोली बसस्थानकावर मध्यरात्रीपासून दोन टेम्पो उभे होते. या टेम्पोबाबत तेथील ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची चौकशी केली असता, गाडीत कोण नसल्याने ते तेथून निघून गेले. त्याचवेळी तेथे उत्पादन शुल्कचे अधिकारी दाखल झाले. ते यातील एक टेम्पो (एमएच १४ डीएम ५९६६) (पान ८ वर)


आंबोलीतील प्रकाराची कसून चौकशी करणार : दरेकर
आंबोलीत घडलेला प्रकार हा गंभीर आहे. जर ग्रामस्थांकडे याची चित्रफीत असल्यास त्यांनी द्यावी. त्याआधारे त्या अधिकाऱ्यांची व कारवाईची चौकशी करू आणि त्यानंतर पुढील कारवाई करू. घडलेला सर्व प्रकार आपण समजावून घेतल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे उत्पादन शुल्क विभागाच्या उपआयुक्त संगीता दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Ampolt caught the tempo of alcohol