शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

शेवाळेवाडीत तीस वर्षांनी पोहोचली एसटी..!

By admin | Updated: December 25, 2014 00:16 IST

पाठपुराव्याला यश : ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

उंडाळे : गाव तेथे एस. टी. ही शासनाची योजना आहे. मात्र शेवाळेवाडी-येवती गावात १९८३ सालानंतर तब्बल ३० वर्षांनी एस. टी. पोहोचली. ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. गावात पोहोचलेल्या एस. टी. चे ग्रामस्थांनी स्वागत केले. शेवाळेवाडी-येवती हे कऱ्हाड तालुक्याच्या पश्चिमेला डोंगरङ्कमाथ्यावर वसलेले गाव आहे. या गावात दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या पुढाकारातून १९८३ साली एस.टी. चालू झाली. मात्र, कालांतराने ती बंद झाली. या गावातील लोक पायी ५ किलोमीटर अंतर चालत ये-जा करत होते. गावाला पुन्हा एस. टी. चालू करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रयत्न केले; पण त्यांना त्यामध्ये अपयश आले. कालांतराने ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल थांबविण्याची विनंती केली. त्यासाठी ग्रामस्थांनी इंद्रजित चव्हाण यांची भेट घेतली. दोन दिवसांपुर्वी शेवाळेवाडी-येवती ही एस. टी. गावात पोहोचली. एस. टी. पाहताच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी एस. टी. चे पुजन करून स्वागत केले.सकाळी ७.३० आणि रात्री ७.३० वाजता अशा एस. टी.च्या दोन फेऱ्या होणार आहेत. एस. टी.च्या स्वागत प्रसंगी सरपंच सदाशिव शेवाळे, जयवंत शेवाळे, शंकर महिंंदकर उपस्थित होते. (वार्ताहर)शेवाळेवाडी गावाला एस. टी. नसल्यामुळे ग्रामस्थांसह विशेष करून विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. अनेक किलोमिटरची पायपीट करून त्यांना शिक्षणासाठी जावे लागत होते. मात्र, एस. टी. पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. - सदाशिव शेवाळे, सरपंच