शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

१४ गावे निर्मलग्रामपासून वंचित

By admin | Updated: October 20, 2014 22:31 IST

सदस्यांची नाराजी : मासिक सभेत माहिती उघड

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात निर्मल ग्राम योजना योग्यप्रकारे राबविली जात नसल्याचा फटका कोलगावसह तालुक्यातील १४ गावांना बसला आहे. सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेवेळी ही माहिती पुढे आल्याने पंचायत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सावंतवाडी तालुक्यात एकूण ६३ गावांपैकी १४ गावे अद्यापही निर्मल ग्राम न झाल्याने सभापती प्रमोद सावंत यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या. तर राज्य शासनाच्या तालुकास्तरीय खात्यातील खाते प्रमुखांनी सभेवर पाठ फिरविल्याने सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली. पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती महेश सारंग, पंचायत समिती सदस्या नारायण राणे, स्वप्निल नाईक, श्वेता कोरगावकर, गौरी आरोंदेकर, अशोक दळवी, शुभांगी गावडे, सुनयना कासकर, वर्षा हरमलकर, राघोजी सावंत, एकनाथ नारोजी, गटविकास अधिकारी बी. बी. महाजन आदी उपस्थित होते. या बैठकीत ग्रामपंचायत विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सभापती प्रमोद सावंत यांच्या मतदार संघातील व उपसभापती महेश सारंग यांच्या कोलगावसह तालुक्यातील १४ गावे अद्यापही निर्मल ग्राम योजनेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. याबाबत सभापती सावंत यांनी संबंधितांना सुचना दिल्या व ही १४ गावे लवकरात लवकर निर्मल ग्राम व्हावी, याबाबत कार्यवाही करण्याचा आदेश दिला. एकात्मिक बालविकास विभागांतर्गत सुरू असलेल्या अंगणवाड्यांना गेले दोन महिने पोषण आहार पुरविला गेला नसल्याची माहितीही उघडकीस आली. याबाबत वरिष्ठ पातळी स्तरावरून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सदस्यांना दिली.सन २०११-१२ च्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींनी केलेल्या अतिरिक्त खर्चास सभागृहात मंजुरी देण्यात आली. २६ ग्रामपंचायतींना १० कोटी ५० लाखाचा मंजुरी देण्यात आली आहे. २८ आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत बेरोजगारांसाठी गावनिहाय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सभेच्या सुरुवातीला आंध्रप्रदेशातील हुडहुड वादळात शहीद झालेल्या माजगाव येथील शुभम सावंत यांना यावेळी सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात आली. (वार्ताहर)