बेस्ट पतपेढी निवडणूक: ठाकरे बंधू विरुद्ध भाजप; आज मतदान, उद्या निकाल!
बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी निवडणुकीत ठाकरे बंधूंचे 'उत्कर्ष' पॅनल विरुद्ध भाजपचे 'सहकार समृद्धी' पॅनल आमनेसामने असणार आहे. आज या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि उद्या निकाल लागणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवर या निकालाचा परिणाम संभव आहे. कारण ठाकरे युतीची ही पहिलीच कसोटी आहे.
व्यापार: इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
UAE OPEC: अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे उद्भवलेल्या जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर United Arab Emirates (UAE) ने मोठा आणि धक्कादायक पाऊल उचलले आहे. यूएईने OPEC आणि OPEC+ या पेट्रोलियम उत्पादक देशांच्या गटांमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
व्यापार: Zomato ची रेकॉर्डब्रेक कामगिरी; अवघ्या ९० दिवसांत केली तब्बल ₹१७४ कोटींची कमाई...
फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स क्षेत्रातील प्रमुख कंपनी Eternal Limited (पूर्वी Zomato) ने वित्त वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत (Q4) अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ नफा ७१ टक्क्यांनी वाढून ₹१७४ कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा नफा ₹३९ कोटी होता, तर तिसऱ्या तिमाहीत ₹१०२ कोटी होता. विश्लेषकांनी ₹१२१ कोटींचा अंदाज व्यक्त केला होता.
छत्रपती संभाजीनगर: उन्हाळ्यातही स्वाभिमानासाठी संघर्ष! छत्रपती संभाजीनगरमधील जिद्दी माणसे
छत्रपती संभाजीनगरमध्ये रणरणत्या उन्हात हमाली करणारे, वाहतूक पोलीस, वृद्ध महिला बकरी चारून उदरनिर्वाह करतात. प्रतिकूल परिस्थितीतही हे लोक जिद्दीने आणि स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे.
आंतरराष्ट्रीय: कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात वाढत्या हिप्पोंच्या (पाणघोडे) संख्येमुळे निर्माण झालेल्या समस्येवर सरकारने कठोर पाऊल उचलत ८० हिप्पोंना ठार करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयावर अनंत यांनी मानवतावादी पर्याय सुचवला असून, त्या हिप्पोंना 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती केली आहे.
व्यापार: रिलायन्सचे खरे 'चाणक्य', मुकेश अंबानी या व्यक्तीला देतात सर्वाधिक पगार; काय करतात? पाहा...
रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांची कंपनी ही भारतातील सर्वात मोठ्या आणि मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला असून, पत्नी नीता अंबानी आणि मुले इशा, आकाश आणि अनंत कंपनीच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, इतक्या मोठ्या साम्राज्यात सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती अंबानी कुटुंबातील नाही.
हिंगोली: हिंगोलीत विवाह सोहळ्यात राडा: बूट चोरल्याने खंजीर खुपसले, दोघे जखमी
हिंगोलीतील लग्नात बूट लपवण्यावरून वाद झाला. यात दोघांना खंजीर मारल्याने ते जखमी झाले. पोलिसांनी गिरगावच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
व्यापार: पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
Nitin Gadkari on Petrol-Diesel: देशातील पारंपरिक इंधनावर(पेट्रोल-डिझेल) चालणाऱ्या वाहनांचा काळ हळूहळू संपत चालल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भविष्यात पेट्रोल-डिझेल वाहने इतिहासजमा होणार आहेत.
बुलढाणा: ‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
बुलढाणा : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या वाचनाच्या प्रस्तावित कार्यक्रमावरून मंगळवारी बुलढाण्यात तणाव निर्माण झाला. आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर वाचन करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कारणास्तव पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना रोखले. या कारवाईवरून आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दडपशाहीचे आरोप केले. आंदोलनकर्त्यांना अक्षरश: फरफरट पोलिस व्हॅनमध्ये कोंबण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर: महिलेची प्रकृती बिघडली अन् संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात रॅकेट उघड.
संभाजीनगरमध्ये महिलेची प्रकृती बिघडल्याने अवैध गर्भपात केंद्र उघडकीस आले. पोलिसांनी गर्भपात साहित्य आणि औषधे जप्त केली, तिघांना अटक. लॅब मालकासह इतरांवर गुन्हा दाखल. महिन्यात तिसऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.
व्यापार: पोस्ट ऑफिस योजना : एकदाच गुंतवणूक, दरमहा ₹९,२५० मिळतील
प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते की आपल्या पैशांवर जोखीम शून्य असावी आणि परतावा भरपूर मिळावा. जर तुम्हीही अशाच सुरक्षित आणि फायदेशीर योजनेच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसची ही सरकारी योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला दरमहा ९,२५० रुपये मिळतील.
व्यापार: सोनं-चांदी स्वस्त! मोठी घसरण, काय आहेत आजचे नवे दर?
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. २८ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६२९ रुपयांनी स्वस्त झाला असून, तो आता १,४९,५५७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलाय. तसंच चांदी ५,३८१ रुपयांनी स्वस्त होऊन २,३८,३३९ रुपये प्रति किलोवर पोहोचली.
व्यापार: आता पेट्रोलमध्ये २० टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिसळले जाणार! सरकारचा मोठा निर्णय...
पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवत आहे. मात्र, या निर्णयामुळे देशातील जुन्या वाहनांच्या कार्यक्षमतेवर काय परिणाम होणार, याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्यापार: Bank of Baroda FD : १ लाखावर ₹५१,६४४ चं निश्चित व्याज, बंपर रिटर्न!
बँक ऑफ बडोदा ही भारतातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक आहे. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना एफडी म्हणजेच मुदत ठेव योजनेवर भरघोस व्याज देत आहे. या सरकारी बँकेचे ग्राहक अवघ्या ७ दिवसांच्या कालावधीसाठी देखील एफडी खातं उघडू शकतात. बँक ऑफ बडोदामध्ये जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं.
जालना: लेकीच्या चिथावणीने बापाने आईला मारले; परतूरमध्ये खळबळ.
परतूरमध्ये कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने मुलीच्या सांगण्यावरून आईची हत्या केली. आरोपी वडील आणि मुलीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, पोलीस तपास करत आहेत.
व्यापार: म्युच्युअल फंड रिडप्शनचा FIFO नियम समजून घ्या, करही वाचवू शकता
इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं हा सध्याच्या काळात संपत्ती निर्मितीचा सर्वात लोकप्रिय मार्ग बनला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की जेव्हा तुम्ही तुमचे पैसे काढता, तेव्हा तुम्ही किती नफा कमावला हे आयकर विभाग कसं ठरवतो? याच ठिकाणी FIFO (First In, First Out) नियम कामाला येतो. हा नियम केवळ तुमच्या कराची गणना करत नाही, तर योग्य नियोजनाद्वारे तुमचे हजारो रुपये देखील वाचवू शकतो.
पुणे: Pune crime : पुण्यात ॲपद्वारे चालणारे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १९ आरोपी अटकेत
पुणे : मोबाइल नंबरशिवाय चालणाऱ्या ॲपच्या माध्यमातून शहरात ड्रग्जचे जाळे पसरले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ॲपच्या माध्यमातून पेडलर आणि ग्राहक थेट संपर्कात राहात होते. तब्बल २३ दिवस गुप्त पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले.
राष्ट्रीय: भारत-न्यूझीलंडची ऐतिहासिक 'मैत्री': ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी
भारत आणि न्यूझीलंडमध्ये १६ वर्षांनी 'वन्स-इन-अ-जनरेशन' करार झाला. यात १५ वर्षांत २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक येणार आहे. कापड, चामड्यासह इतर वस्तूंना न्यूझीलंडमध्ये विनाशुल्क प्रवेश दिला जाईल. त्यातून भारतीय शेतकऱ्यांचे हित जपले जाणार आहे. आनंदाची बाब म्हणजे, ‘तात्पुरता रोजगार प्रवेश व्हिसा’ अंतर्गत ५,००० कुशल भारतीयांना न्यूझीलंडमध्ये ३ वर्षांपर्यंत काम करण्याची संधी मिळेल.
व्यापार: सोन्या-चांदीच्या दरात बदल; काय आहे नवी किंमत?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २८ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. बाजार उघडल्यानंतर सुरुवातीला सोन्यात किरकोळ तेजी दिसली होती, मात्र त्यानंतर दरात घसरण झाली. आज सोन्याची किंमत १,५१,५९५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४०,९१२ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
महाराष्ट्र: महाराष्ट्रात क्षयरोगाचा धोका वाढला; ११ हजार गावांना सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रामध्ये क्षयरोगाचा धोका वाढला असून ११ हजार गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एका विशेष मोहिमेत ३५ दिवसांत ६००० पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून दीड कोटी लोकांची तपासणी सुरू आहे. देशातील दीड लाख तर एकट्या महाराष्ट्रातील ११ हजार ९१ गावांना क्षयरोगाचा धोका आहे. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सध्या ‘एआय’आधारित व्हीएमटीबी टूलचा वापर केला जात आहे.
मुंबई: रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती लांबणीवर?; आज बैठक होणार
राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय झाला होता. मात्र याची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भाषा शिकण्यासाठी संघटनांनी मुदतवाढीची मागणी केली होती. आज परिवहन विभागाच्या बैठकीत यावर निर्णय अपेक्षित आहे. सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला शिंदेसेनेचे उत्तर भारतीय नेते संजय निरूपम, रिक्षा संघटनेचे शशांक राव तसेच इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
राष्ट्रीय: दाऊदचा साथीदार सलीम डोला तुर्कस्तानात जेरबंद, भारतात आणला
दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार, ड्रग तस्कर सलीम डोला याला तुर्कस्तानमधून भारतात आणले. तो ५,००० कोटी रुपयांचे अमली पदार्थांचे सिंडिकेट चालवत होता, सध्या चौकशी सुरू आहे.
व्यापार: शेअर बाजारात घसरण; 'या' शेअर्सची रेड झोनमध्ये सुरुवात
मंगळवारी घरगुती शेअर बाजारानं घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहाराला सुरुवात केली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, बीएसई (BSE) सेन्सेक्स २०८.८४ अंकांच्या (०.२७ टक्के) घसरणीसह ७७,०९४.७९ अंकांवर उघडला. तर, एनएसई (NSE) निफ्टी ५० इंडेक्सनंही आज ४२.८० अंकांची (०.१८ टक्के) घसरण नोंदवत २४,०४९.९० अंकांवर व्यवहार सुरू केला.
आंतरराष्ट्रीय: इराण तेल संकटात! साठवण क्षमता संपली, निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणच्या तेल क्षेत्रावर दबाव वाढला असून साठवण क्षमता संपुष्टात येत आहे. खार्ग बेटावरील साठा जवळपास पूर्ण भरला, त्यामुळे उत्पादनाला धोका निर्माण झाला आहे. युद्धविराम लागू असला तरी अमेरिका आणि इराण यांच्यात सामुद्रधुनीवरून तणाव कायम आहे. इराणच्या एकूण उत्पादनापैकी ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा खार्ग बेटावरून येतो. येथे सुमारे ३ कोटी बॅरल साठवणूक क्षमता असून ती जवळपास पूर्ण भरली आहे.
पुणे: Pune Crime: महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून केला अत्याचार
पुणे : लोणी काळभोर परिसरात एका महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी अक्षय अशोक सानप (वय २८ वर्षे, रा. सय्यदनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे: ‘जर तू माझी झाली नाहीस, तर...' लग्नास नाही म्हटल्याचा राग मनात धरून मारहाण
पुणे : तरुणीने लग्नासाठी नाही म्हटले याचा राग मनात धरून तिचा पाठलाग करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र: पक्ष विलीन करा, विधान परिषदेची आमदारकी घ्या: बच्चू कडूंना अट
पक्ष विलीन करून विधान परिषदेची जागा घ्या अशी अट बच्चू कडू यांना शिंदेसेनेने घातली आहे. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात बच्चू कडू विरुद्ध भाजप असे चित्र असताना कडू हे शिंदेसेनेत गेल्यास भाजपची भूमिका काय असेल, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. विलीनीकरणाबाबत कोणती भूमिका घ्यावी यासाठी कडू यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मेसेजेस करून त्यांची मते मागविली आहेत.
क्राइम: फरार मार्कसोबत जियाचे जॉइंट अकाउंट; ड्रग्ज विक्रीतून १४.९५ लाख?
नेस्को ड्रग्ज प्रकरणात अटक जियाचे फरार मार्कसोबत जॉइंट अकाउंट उघडकीस आले आहे. या खात्यात जमा १४.९५ लाख अमली पदार्थांच्या विक्रीतून जमा झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस कोठडी ३० एप्रिलपर्यंत वाढवली. मार्क परदेशात असल्याची शक्यता आहे. त्याचे मित्र आणि नातेवाइकांच्या चौकशीच्या माध्यमातून पोलिस त्याचा ठावठिकाणा शोधत आहेत. जिया २०१२ पासून मार्कच्या संपर्कात होती. चार वर्षांपासून ती लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती
मुंबई: मुंबईत परवडणारी घरे मिळेना; म्हाडा लॉटरीला सामान्यांचा अल्प प्रतिसाद
म्हाडा’च्या मुंबई मंडळाच्या परवडणाऱ्या २ हजार ६४० घरांसाठी २७ एप्रिलपर्यंत ४५ हजार ८१० अर्ज आले असून यापैकी २९ हजार ६१० अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. एव्हाना म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज येतात. मात्र, यावर्षीच्या लॉटरीमधील घरांसाठी आलेल्या अर्जांची संख्या पाहता तूर्तास तरी मुंबईकरांनी अवाच्या सव्वा दर असणाऱ्या घरांकडे पाठ फिरवल्याची चर्चा म्हाडाच्याच मुख्यालयात रंगली आहे.
महाराष्ट्र: विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीत ४ नावांची चर्चा; विक्रम काकडे आघाडीवर
राज्याच्या विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यांत संपत आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. या नऊ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अदित पवार)च्या वाट्याला एक जागा आली असून या एका जागेसाठी रस्सी खेच सुरू असल्याचे दिसते. या एका जागेसाठी एकूण चार नावाची जोरदार चर्चा सुरू असून विक्रम काकडे यांचे नाव आघाडीवर असल्याची समजते.
क्रिकेट: Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 'रन मशीन' विराट कोहलीनं नवा इतिहास रचला. आयपीएल स्पर्धेत ९००० धावांचा पल्ला गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. घरच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ अवघ्या ७५ धावांत आटोपला. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीनं षटकार मारत संघाचा विजय निश्चित केला. त्याआधी त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.