महिलेची प्रकृती बिघडली अन् अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; छ. संभाजीनगरात पहाटे कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:45 IST2026-04-28T14:44:04+5:302026-04-28T14:45:51+5:30

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात तिसरी कारवाई; रशिदपुरा भागात मनपा आणि पोलिसांचा छापा

Woman's health deteriorates and illegal abortion racket exposed; Action taken in early morning in Ch. Sambhajinagar | महिलेची प्रकृती बिघडली अन् अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; छ. संभाजीनगरात पहाटे कारवाई

महिलेची प्रकृती बिघडली अन् अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; छ. संभाजीनगरात पहाटे कारवाई

छत्रपती संभाजीनगर: शहरातील रशिदपुरा येथील 'खमर विला' (प्लॉट नं. १६) या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर आज, मंगळवारी ( दि. २८) पहाटे २ वाजेच्या सुमारास महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त धाड टाकली. या कारवाईत अवैध गर्भपातासाठी लागणारे साहित्य, सोनोग्राफी प्रोब आणि औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण ६ आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, शहरात महिनाभरात तिसऱ्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने खळबळ उडाली आहे.

महिलेची प्रकृती खालावल्याने प्रकार उघड
एका गर्भवती महिलेला गर्भपातासाठी २७ एप्रिल रोजी सायंकाळी या ठिकाणी आणले होते. तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या, मात्र त्यानंतर पहाटे तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे पहाटे ३:३० वाजता भरती करण्यात आले आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना दिली आणि तातडीने धाड टाकण्यात आली.

पॅथलॅब चालकासह ६ आरोपींवर गुन्हा
या कारवाईत पोलिसांनी शाहिदा परवीन सय्यद (५१), नसरीन वजीर शेख (४७), सय्यद इर्शाद अहमद (६१) यांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गर्भपात होणाऱ्या महिलेची तपासणी सिडको एन-६ येथील 'बिटेल डायग्नोस्टिक पॅथलॅब'मध्ये केली जात होती. या लॅबचे चालक मंगेश थोरात, मीनाक्षी थोरात आणि संबंधित गर्भवती महिलेची आई अशा एकूण ६ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title : महिला की हालत बिगड़ने पर संभाजीनगर में अवैध गर्भपात रैकेट का भंडाफोड़।

Web Summary : संभाजीनगर में एक गर्भवती महिला की हालत बिगड़ने के बाद एक अवैध गर्भपात केंद्र का भंडाफोड़ हुआ। पुलिस ने गर्भपात उपकरण और दवाएं जब्त कर तीन लोगों को गिरफ्तार किया। एक लैब मालिक और दो अन्य पर भी मामला दर्ज किया गया है। इस महीने में यह तीसरा ऐसा रैकेट उजागर हुआ है।

Web Title : Illegal abortion racket busted after woman's health deteriorates in Sambhajinagar.

Web Summary : A raid in Sambhajinagar exposed an illegal abortion center after a pregnant woman's condition worsened. Police seized abortion equipment and medications, arresting three. A lab owner and two others are also booked. It's the third such racket uncovered this month.