Pune Crime: महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून केला अत्याचार; हडपसरमधील आरोपीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 09:32 IST2026-04-28T09:31:37+5:302026-04-28T09:32:52+5:30

Pune Crime : वाटेत त्याने पीडितेने पाणी मागितले असता तिला गुंगीचे औषध मिसळलेले पाणी पाजले.

Pune Crime Woman tortured by giving her a drug called Gungi from water | Pune Crime: महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून केला अत्याचार; हडपसरमधील आरोपीवर गुन्हा दाखल

Pune Crime: महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून केला अत्याचार; हडपसरमधील आरोपीवर गुन्हा दाखल

 पुणे : लोणी काळभोर परिसरात एका महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी अक्षय अशोक सानप (वय २८ वर्षे, रा. सय्यदनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी एका ३३ वर्षीय पीडित महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. २५) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी अक्षय सानप याने पीडितेची भेट घेऊन तिला काहीही न सांगता जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि फुरसुंगीच्या दिशेने नेले.

वाटेत त्याने पीडितेने पाणी मागितले असता तिला गुंगीचे औषध मिसळलेले पाणी पाजले. यामुळे पीडितेला गुंगी आली असता, आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नाळे करत आहेत.

 

Web Title : हडपसर में महिला को नशीला पदार्थ पिलाकर दुष्कर्म; आरोपी पर मामला दर्ज।

Web Summary : लोनी कालभोर इलाके में एक महिला को नशीला पदार्थ पिलाकर यौन उत्पीड़न किया गया। आरोपी अक्षय सानप पर मामला दर्ज किया गया है, जिसने पीड़िता को जबरन बाइक पर बैठाया, उसके पानी में नशीला पदार्थ मिलाया और हमला किया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Woman drugged, assaulted in Hadapsar; accused booked by police.

Web Summary : A woman was drugged and sexually assaulted in the Loni Kalbhor area. Akshay Sanap, the accused, has been booked after he forced the victim onto his bike, drugged her water, and assaulted her. Police are investigating.