Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता पेट्रोलमध्ये २० टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिसळले जाणार! सरकारचा मोठा निर्णय...

आता पेट्रोलमध्ये २० टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिसळले जाणार! सरकारचा मोठा निर्णय...

Ethanol Blending Petrol: इंधन आयात खर्च कमी करण्यासाठी तयारी सुरू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:51 IST2026-04-28T13:48:27+5:302026-04-28T13:51:57+5:30

Ethanol Blending Petrol: इंधन आयात खर्च कमी करण्यासाठी तयारी सुरू...

Ethanol Blending Petrol: Now more than 20 percent ethanol will be mixed in petrol! Government's big decision | आता पेट्रोलमध्ये २० टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिसळले जाणार! सरकारचा मोठा निर्णय...

आता पेट्रोलमध्ये २० टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिसळले जाणार! सरकारचा मोठा निर्णय...

Ethanol Blending Petrol: पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवत आहे. मात्र, या निर्णयामुळे देशातील जुन्या वाहनांच्या कार्यक्षमतेवर काय परिणाम होणार, याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुन्या वाहनांवर संभाव्य परिणाम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एप्रिल २०२३ पूर्वी तयार झालेल्या वाहनांवर जास्त इथेनॉल मिश्रणाचा परिणाम दिसू शकतो. विशेषतः E10 (१०% एथेनॉल) साठी डिझाइन केलेली वाहने, जर E20 (२०% एथेनॉल) इंधनावर चालवली, तर त्यांच्या मायलेजमध्ये साधारण १ ते २ टक्क्यांनी घट होऊ शकते. NITI Aayog च्या E20 रोडमॅप अहवालातही असेच संकेत देण्यात आले आहेत. 

तांत्रिक बदलांची गरज अधोरेखित

या अहवालाशी संबंधित एका सदस्याने सांगितले की, देशाच्या ऊर्जा गरजांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. मात्र, पुढे जाण्यापूर्वी वाहनांच्या तंत्रज्ञानात आवश्यक सुधारणा आणि योग्य धोरणे तयार करणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्वसामान्य वाहनधारकांना कोणताही त्रास होणार नाही.

सरकारची भूमिका आणि आकडेवारी

सरकारच्या मते, इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल (EBP) कार्यक्रमामुळे देशाला मोठा फायदा झाला आहे. दरवर्षी सुमारे ४.५ कोटी बॅरल कच्च्या तेलाची बचत होत आहे. तसेच, आतापर्यंत जवळपास १.६५ लाख कोटी रुपयांची परकीय चलनाची बचत झाली आहे.

वाहनांच्या संदर्भात, २०१२ ते मार्च २०२३ दरम्यान तयार झालेल्या बहुतांश गाड्या E10 साठी डिझाइन करण्यात आल्या होत्या. मात्र, एप्रिल २०२३ नंतर तयार होणाऱ्या नवीन गाड्या E20 साठी सुसंगत बनवण्यात येत आहेत. या गाड्या २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर सहज चालू शकतात.

इंधन आयात खर्चावर परिणाम

इथेनॉल मिश्रण वाढवण्यामुळे भारताचा परकीय तेलावरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, इंधन आयात खर्चात घट होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीतील चढ-उतारांचा परिणामही काही प्रमाणात कमी होईल. याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना होण्याची शक्यता आहे.

शेती आणि स्थानिक उद्योगांना चालना

इथेनॉलसारख्या स्थानिक पर्यायांचा वापर वाढल्याने देशातील शेतकरी आणि संबंधित उद्योगांना फायदा होणार आहे. ऊस आणि इतर पिकांपासून इथेनॉल निर्मितीला चालना मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल.

Web Title : पेट्रोल में 20% से अधिक इथेनॉल मिश्रण: सरकार का बड़ा फैसला

Web Summary : भारत ने आयात निर्भरता कम करने के लिए पेट्रोल में इथेनॉल मिश्रण बढ़ाया। पुराने वाहनों में थोड़ी कम माइलेज संभव। इससे अर्थव्यवस्था और किसानों को लाभ होगा।

Web Title : India to Blend Over 20% Ethanol in Petrol: Government Decision

Web Summary : India increases ethanol blending in petrol to reduce import reliance. Older vehicles may see slight mileage reduction. This move benefits the economy and farmers.