Pune crime: ‘जर तू माझी झाली नाहीस, तर...' लग्नास नाही म्हटल्याचा राग मनात धरून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 09:33 IST2026-04-28T09:17:34+5:302026-04-28T09:33:57+5:30
Pune crime - ‘जर तू माझी झाली नाहीस, तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी त्याने दिली.

Pune crime: ‘जर तू माझी झाली नाहीस, तर...' लग्नास नाही म्हटल्याचा राग मनात धरून मारहाण
पुणे : तरुणीने लग्नासाठी नाही म्हटले याचा राग मनात धरून तिचा पाठलाग करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका ३० वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. आरोपीने तिचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिला आहे. जानेवारी ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला.
आरोपीने पीडितेचा वारंवार पाठलाग केला आणि तिच्या घरात शिरून तिला मारहाण केली. ‘जर तू माझी झाली नाहीस, तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी त्याने दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रसाद जाधव करीत आहेत.