छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर: रॉंग साईड जीपने पती-पत्नीसह चिमुकल्याचा घेतला बळी
गंगापूर-वैजापूर मार्गावर भरधाव जीपने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी आणि त्यांच्या एका वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सजन राजपूत आपल्या कुटुंबासोबत वाळूजला जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
व्यापार: सकाळी दमदार सुरुवात, मात्र दिवसाखेर किरकोळ वाढ; गुंतवणूकदारांचे ७१ हजार कोटी स्वाहा...
आज(२० एप्रिल) रोजी भारतीय शेअर बाजारात दिवसभर चढ-उताराचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, दिवसाखेर प्रमुख निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळाली. BSE Sensex २६.७६ अंकांनी (०.०३%) वाढून ७८,५२०.३० वर बंद झाला, तर NSE Nifty 50 ११.३० अंकांनी (०.०५%) वाढून २४,३६४.८५ वर स्थिरावला.
व्यापार: जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
Rajnath Singh Germany Visit: भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारपासून जर्मनीच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि जर्मनीमधील संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करणे हा आहे.
छत्रपती संभाजीनगर: चीज अस्सल की कृत्रिम? मेनूवर माहिती देणे बंधनकारक!
कृत्रिम चीज वापराबाबत FDA चा महत्वाचा निर्णय. मेनूकार्डवर स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक; उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई. अधिकृत पुरवठादारांकडूनच खरेदी करावी.
व्यापार: 'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा
US Dollar and Chinese Yuan: अमेरिका-इराण संघर्षाची झळ आता UAE (यूएई) पर्यंत पोहोचू लागली आहे. यूएईने या तणावासाठी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना जबाबदार ठरवत इशारा दिला की, जर डॉलरची टंचाई निर्माण झाली, तर तेल आणि गॅस व्यवहारांसाठी चीनी युआनसह इतर चलनांचा वापर सुरू केला जाईल.
छत्रपती संभाजीनगर: लाइट्स, कॅमेरा, छत्रपती संभाजीनगर! ऐतिहासिक स्थळांमुळे शूटिंगमध्ये वाढ
छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे शूटिंग हब बनले आहे, ज्यामुळे ₹122 कोटींचा महसूल मिळाला आहे. चित्रपट शूटिंगमुळे हॉटेलपासून ते छोट्या दुकानांपर्यंत स्थानिक व्यवसायांना चालना मिळाली आहे. वाढलेली कनेक्टिव्हिटी आणि विविध लोकेशन्समुळे निर्मात्यांसाठी हे शहर महत्त्वाचे ठरत आहे.
व्यापार: बाजारात तेजी, पण LensKart चे शेअर घसरले; 'टिकली-गंध' वादापूर्वी गाठला होता उच्चांक
LensKart Share: ड्रेस कोड वादामुळे चर्चेत आलेल्या लेंसकार्टच्या शेअर्समध्ये आजच्या व्यवहारात घसरण पाहायला मिळाली. बाजारात तेजी असतानाही कंपनीचा शेअर घसरला. शुक्रवारी शेअर ५३४.८५ रुपयांवर बंद झालेला शेअर सोमवारच्या सत्रात ५३०.०५ रुपयांवर उघडला अन् दुपारी २.३० वाजेपर्यंत सुमारे २% घसरून ५२४ रुपयांवर आला.
महाराष्ट्र: महिला आरक्षणावर सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले
सुप्रिया सुळेंनी महिला आरक्षणावरील चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आव्हान स्वीकारले. अंमलबजावणीतील विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, जातीय जनगणनेसाठी निधी वितरणाची मागणी केली. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने महिला आरक्षणात केलेल्या अग्रेसर कार्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपाच्या भूमिकेवर टीका केली.
व्यापार: इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या Strait of Hormuz अनेक दिवसांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, संघर्ष काहीअंशी कमी झाल्यामुळे शनिवारी २० पेक्षा अधिक जहाजांनी सुरक्षितपणे होर्मुझ पार केले. शिपिंग अॅनालिटिक्स फर्म Kpler च्या माहितीनुसार, १ मार्चनंतर होर्मुजमधून गेलेल्या जहाजांची ही सर्वाधिक संख्या आहे. या जहाजांमध्ये तेल, गॅस आणि इतर माल वाहून नेणारे मोठे टँकर्स होते.
छत्रपती संभाजीनगर: निकोटिन गम: सिगारेट सोडणाऱ्या तरुणाईसाठी 'धोक्याचा सापळा'.
सिगारेट सोडण्यासाठी वापरले जाणारे निकोटिन गम तरुणाईसाठी व्यसन ठरत आहे. एका गमध्ये चार सिगारेटइतके निकोटिन असते, ज्यामुळे चिंता आणि आरोग्य समस्या येतात. डॉक्टरांनी सावधगिरी आणि वैद्यकीय मार्गदर्शन घ्यायला सांगितले आहे.
व्यापार: स्वच्छतेसह केली मोठी कमाई; भंगार विक्रीतून रेल्वेला मिळाले ३१७ कोटी रुपये
भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वे (NCR) झोनने महसूल वाढीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लोखंडी साहित्य आणि भंगार विक्रीतून तब्बल ३१७ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. याशिवाय, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करून १४८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय, मालवाहतुकीतही २१ मिलियन टनांपेक्षा जास्त मालाची वाहतूक करून नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे.
बीड: गर्भपातानंतर बालविवाह उघड; पतीसह कुटुंबीयांवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा.
अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताने बालविवाह उघडकीस. अवैध विवाह प्रकरणी पोलिसांनी पती आणि कुटुंबीयांवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलगी शिक्षण घेत असताना दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. तपास सुरू आहे.
मुंबई: काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करणार: मुख्यमंत्री फडणवीस
विरोधी पक्षांचा महिला विरोधी दृष्टिकोन उघड करणार, महिला आरक्षणासाठी एक कोटी सह्या गोळा करणार, असा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. काँग्रेस आणि मित्रपक्षांनी विधेयकाला विरोध केल्याचा आरोप करत भाजपने महिला मुख्यमंत्र्यांची परंपरा जपल्याचे त्यांनी सांगितले. विधेयक २०२९ पर्यंत लागू होईल, असा दावा त्यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर: जालना रोडवर ८५ कोटींचे 'पीडब्ल्यूडी' संकुल; डिझाईनला मंजुरी.
छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवर ८५ कोटींचे 'पीडब्ल्यूडी' प्रशासकीय संकुल उभारले जाणार आहे. इमारतीच्या डिझाईनला मंजुरी मिळाली असून, सर्व कार्यालये एकाच ठिकाणी येणार आहेत. दोन वर्षात बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
व्यापार: ऑल टाईम हायवरून ₹२१ वर आलेला Ola चा शेअर; आता आचानक ९०% वाढ, खरेदी करावा का?
इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रातील मोठी कंपनी Ola Electric Mobility च्या शेअर्समध्ये अलीकडच्या काळात मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, आता या शेअरनी दमदार कमबॅक केले आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीचे शेअर्स ऑल-टाइम हाईपासून ८५% पेक्षा जास्त घसरून अवघ्या २१.२१ रुपयांवर आले होते. मात्र, आता शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचतारांकित हॉटेल्सची भर, शहरात येणार सहा नवीन हॉटेल्स.
छत्रपती संभाजीनगर शहरात लवकरच सहा नवीन पंचतारांकित हॉटेल्स येणार आहेत. औद्योगिक विकास आणि वाढती लोकसंख्या यामुळे हॉटेल्सच्या व्यवसायात वाढ होणार आहे. डीएमआयसीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे.
व्यापार: या तीन शेअर्समध्ये ५६ टक्क्यांची वाढ; Tata समूहाच्या दोन कंपन्यांचा समावेश, पाहा टार्गेट प्राइस...
शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. अशाच शेअर्समध्ये Bharat Electronics Limited, Tata Steel आणि Titan चा समावेश आहे. या तिन्ही शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात जोरदार तेजी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या काळात BSE Sensex निर्देशांकात सुमारे ०.०८% घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, आता प्रॉफिट बुक करावा की, अजून होल्ड करावे?
व्यापार: सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
कमोडिटी बाजारात आज (सोमवार, २० एप्रिल) आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली. MCX वर सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या दर लक्षणीयरित्या घसरले. सकाळी सुमारे ९:१० वाजता सोने १% किंवा १,५०० रुपयांपेक्षा अधिक घसरून १,५३,०३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेड करत होते. तर चांदीचा दरही सुमारे ५,००० रुपयांनी घसरून २,५३,१६८ रुपये प्रति किलोवर आला.
व्यापार: शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
आज(दि.२०) आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात झाली. प्रमुख निर्देशांक BSE Sensex आणि NSE Nifty 50 हिरव्या रंगावर उघडले. ३० समभागांचा सेन्सेक्स १३९.३६ अंकांनी (०.१८%) वाढून ७८,६३२.९० या पातळीवर उघडला. तर, निफ्टीनेही ३७.९५ अंकांची (०.१६%) वाढ नोंदवत २४,३९१.५० वर सुरुवात केली.
क्रिकेट: IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
प्रियांश आर्य आणि कूपर कॉनॉली यांच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने उभारलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौ सुपर जाएंट्सचा संघ हतबल ठरला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्सने निर्धारित २० षटकात २५४ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौचा संघ ५ विकेट्सच्या मोबदल्यात २०० धावांपर्यंतच पोहचू शकला. पंजाब किंग्सने ५४ धावांनी विजय नोंदवत नवा इतिहास रचला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका हंगामात सलग सहा सामन्यानंतर अपराजित राहणारा पंजाब हा पहिला संघ ठरला आहे.
फिल्मी: 'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेच्या सुरुवातीला धक्कादायक एलिमिनेशन!
'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. राकेश बापट, विशाल कोटियान, अनुश्री माने, तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद या टॉप ५ स्पर्धकांमध्ये 'बिग बॉस मराठी ६'ची ग्रँड फिनाले रंगणार आहे. रितेश देशमुखच्या उपस्थितीत 'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेचं पहिलं एविक्शन पार पडलं. यात अभिनेत्री दिपाली सय्यद घराबाहेर पडली आहे. ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच दिपालीच्या बाहेर पडण्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.
आंतरराष्ट्रीय: '...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तानात बैठका होत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला हल्ल्याचा इशारा दिला आहे. इस्लामाबाद येथे सुरू होणाऱ्या शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इराणने प्रस्तावित करार नाकारल्यास अमेरिका त्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करेल.
क्रिकेट: RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेच्या फिरकीतील जादूसह कार्तिक त्यागीचा भेदक माऱ्यानंतर फलंदाजीत उप कर्णधार रिंकू सिंहच्या फिनिशिंग टचच्या जोरावर अखेर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने सातव्या सामन्यात पहिला विजय नोंदवला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १५५ धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर १५६ धावांचे टार्गेट सेट केले होते. अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात रिंकू सिंह याने षटकारासह नाबाद अर्धशतक साजरे करत संघाचा विजय निश्चित केला.
ऑटो: काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ही वाढती मागणी पाहता कंपन्या आपल्या नवनवीन EV गाड्या लॉन्च करत आहेत. आता याच यादीत बंगळुरूस्थित स्टार्टअप Simple Energy चेही नाव जोडले आहे. कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘Simple Ultra’ लॉन्च केली आहे. या स्कूटरची खासियत म्हणजे, कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये तब्बल ४०० किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते.
राष्ट्रीय: फटाक्याच्या कारखान्यात स्फोट: १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
फटाके बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात तब्ल १९ कामगारांचा तडफडून मृत्यू झाला. यात घटनेत ६ कामगार जखमी झाले असून, काही कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रविवारी दुपारी विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टीमध्ये ही घटना घडली. स्फोटानंतर घटनास्थळाची दृश्ये थरकाप उडवणारी होती.
व्यापार: १०० वर्षांपर्यंत उत्पन्नाची हमी! LIC चा ‘जीवन उमंग’ की ‘जीवन उत्सव’, कोणता प्लान फायदेशीर?
स्थिर उत्पन्न आणि सुरक्षित गुंतवणूक हा प्रत्येकाला हवी असते. शेअर बाजारातील चढ-उतार टाळून दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी अनेकजण विमा-आधारित गुंतवणुकीकडे वळतात. अशा गुंतवणूकदारांसाठी भारतीय जीवन विमा निगम, म्हणजेच LIC चे ‘जीवन उमंग’ आणि ‘जीवन उत्सव’ हे दोन प्लान फायदेशीर ठरू शकतात. हे दोन्ही प्लान १०० वर्षांपर्यंत रिस्क कव्हर देतात. मात्र, कोणता प्लॅन अधिक फायदेशीर आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
व्यापार: नोकरी गेल्यावर PF खात्यातील रकमेवर व्याज मिळते का? जाणून घ्या EPFO चा 'हा' नियम
EPFO: करिअरमध्ये चढ-उतार येणे सामान्य आहे. नोकरी जाणे, कंपनी बंद होणे किंवा ब्रेक घेणे...यामुळे नियमित पगार थांबतो आणि आर्थिक सुरक्षिततेची चिंताही वाढते. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, प्रॉविडंट फंड (PF) मध्ये जमा झालेल्या रकमेचे काय होईल? नोकरी गेल्यानंतर त्यावर व्याज मिळणे थांबेल का? या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
राष्ट्रीय: सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
महाकुंभ मेळ्यात सौंदर्यामुळे प्रसिद्धी मिळालेली हर्षा रिछारिया हिने संन्यास घेतला. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये रविवारी तिने स्वतःचे पिंडदान केले. मंगलनाथ येथील गंगाघाटावर मोनी तीर्थ पीठाधीश्वर सुमनाजी महाराज यांच्याकडून हर्षाने दीक्षा घेतली. संसार सुखाचा त्याग करत हर्षाने संन्यासी जीवनात प्रवेश केला.
व्यापार: नाशिकमध्ये तयार होणार १०० Su-57 फायटर जेट्स; रशियाची भारताला मोठी ऑफर...
भारत आणि रशियाचे संबंध सर्वश्रृत आहेत. रशियाने वेळोवेळी भारताला लष्करी साहित्य पुरवले आहे. आता पुतिन सरकारने भारताला गेल्या दशकातील सर्वात मोठा लष्करी विमान प्रस्ताव दिला आहे. त्याअंतर्गत भारतात किमान १०० Su-57 स्टेल्थ फायटर जेट्सचे उत्पादन केले जाणार आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान हस्तांतरणचीदेखील ऑफर दिली आहे. हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे, जेव्हा भारतीय वायुसेनेला (IAF) लढाऊ विमानांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.
पुणे: Pune Crime : पुण्यात मृत व्यक्तीच्या नावे मालमत्ता हडपणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
लोहगाव : पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे जी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल अशी आहे. मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींची मालमत्ता हडपणाऱ्या एका सराईत टोळीचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे
व्यापार: मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाचा परिणाम थेट भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर पडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मार्च महिन्यात देशातील एलपीजी (LPG) वापरात सुमारे १३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ऊर्जा दरांमध्ये अस्थिरता वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.