छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवर उभारणार ८५ कोटींचे भव्य 'पीडब्ल्यूडी' संकुल; मंत्र्यांनी दिली डिझाईनला मंजुरी

By बापू सोळुंके | Updated: April 20, 2026 12:30 IST2026-04-20T12:29:40+5:302026-04-20T12:30:03+5:30

बांधकाम विभागाचे प्रशासकीय संकुल, जालना रोडच्या सौंदर्यात भर घालणार ८५ कोटींची इमारत

A grand 'PWD' complex worth Rs 85 crore will be built on Jalna Road in Chhatrapati Sambhajinagar; Minister approves the design | छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवर उभारणार ८५ कोटींचे भव्य 'पीडब्ल्यूडी' संकुल; मंत्र्यांनी दिली डिझाईनला मंजुरी

छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवर उभारणार ८५ कोटींचे भव्य 'पीडब्ल्यूडी' संकुल; मंत्र्यांनी दिली डिझाईनला मंजुरी

छत्रपती संभाजीनगर: सार्वजनिक बांधकाम विभागाची आणखी एक बहुमजली इमारत जालना रोडच्या सौंदर्यात भर घालणार आहे. हायकोर्टालगत असलेल्या विद्युत विभागाच्या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकत्रित प्रशासकीय संकुल उभारण्यात येणार आहे. मुख्य अभियंत्यापासून सर्व अभियंते येथे असतील. विभागाचे एकत्रित प्रशासकीय संकुल म्हणून ती इमारत असणार आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेसिंह भोसले यांनी सदरील इमारतीच्या डिझाईनला मंजुरी दिली आहे. इमारतीच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात ८५ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली आहे. बांधकाम विभागाचे सध्या चार कार्यालये शहरात आहेत. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व सर्कलसह विद्युत विभाग मिळून चार कार्यालये आहेत. ही सर्व कार्यालय प्रशासकीय संकुलात एकाच ठिकाणी असणार आहेत.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये अशी...
प्रशासकीय मान्यता : राज्य शासनाने या संकुलाच्या उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता दिली असून, यासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
एकात्मिक कार्यालय: या संकुलात सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मंडळ कार्यालय आणि जागतिक बँक प्रकल्प यांसारखी सर्व महत्त्वाची कार्यालये एकाच छताखाली आणण्याचे नियोजन आहे.
ठिकाण: हे संकुल जालना रोडवरील आकाशवाणी परिसरातील बांधकाम विभागाच्या च्या स्वतःच्या सुमारे ५ एकर जागेवर उभारले जाणार आहे.
आधुनिक सुविधा: इमारतीमध्ये प्रशस्त पार्किंग, आधुनिक कॉन्फरन्स हॉल, लिफ्ट आणि अभ्यागतांसाठी अद्ययावत सुविधा असतील.

मुख्य अभियंता काय म्हणाले...
बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्ररसिंहराजे भाेसले यांनी इमारतीच्या डिझाईनला मंजुरी दिली आहे. जागतिक बँक प्रकल्प विभागाकडून इमारतीचे काम करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत काम पुर्ण करण्याचे नियोजन आहे.
-अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, पीडब्ल्यूडी

Web Title : छत्रपति संभाजीनगर में जालना रोड पर बनेगा 85 करोड़ का पीडब्ल्यूडी परिसर।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर के जालना रोड पर 85 करोड़ रुपये का बहुमंजिला पीडब्ल्यूडी प्रशासनिक परिसर बनेगा। डिजाइन को मंजूरी मिल गई है, जिससे कार्यालयों को कुशलतापूर्वक समेकित किया जा सकेगा। इसमें प्रमुख विभाग और आधुनिक सुविधाएं होंगी, जिसका लक्ष्य दो वर्षों के भीतर पूरा करना है।

Web Title : Chhatrapati Sambhajinagar to get ₹85 crore PWD complex on Jalna Road.

Web Summary : An ₹85 crore multi-story PWD administrative complex will be built on Jalna Road, Chhatrapati Sambhajinagar. The design is approved, consolidating offices for efficiency. It will house key departments and modern facilities, aiming completion within two years.