Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > बाजारात तेजी, पण LensKart चे शेअर घसरले; 'टिकली-गंध' वादापूर्वी गाठला होता उच्चांक

बाजारात तेजी, पण LensKart चे शेअर घसरले; 'टिकली-गंध' वादापूर्वी गाठला होता उच्चांक

LensKart Share: टिकली आणि गंध लावण्यास विरोध केल्याने 'लेन्सकार्ट'वर प्रचंड टीका झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 14:49 IST2026-04-20T14:47:39+5:302026-04-20T14:49:24+5:30

LensKart Share: टिकली आणि गंध लावण्यास विरोध केल्याने 'लेन्सकार्ट'वर प्रचंड टीका झाली.

LensKart Share: Markets rise, but LensKart shares fall; had reached a high before the 'dress code' controversy | बाजारात तेजी, पण LensKart चे शेअर घसरले; 'टिकली-गंध' वादापूर्वी गाठला होता उच्चांक

बाजारात तेजी, पण LensKart चे शेअर घसरले; 'टिकली-गंध' वादापूर्वी गाठला होता उच्चांक

LensKart Share: ड्रेस कोड वादामुळे चर्चेत आलेल्या लेंसकार्टच्या शेअर्समध्ये आजच्या व्यवहारात घसरण पाहायला मिळाली. बाजारात तेजी असतानाही कंपनीचा शेअर घसरला. शुक्रवारी शेअर ५३४.८५ रुपयांवर बंद झालेला शेअर सोमवारच्या सत्रात ५३०.०५ रुपयांवर उघडला अन् दुपारी २.३० वाजेपर्यंत सुमारे २% घसरून ५२४ रुपयांवर आला. 

विशेष म्हणजे, १५ एप्रिल रोजी शेअर ५५९.८० रुपयांच्या ऑल-टाइम हाईवर होता, त्यानंतर यात ७% पेक्षा अधिक घसरण झाली. यासोबतच कंपनीचे मार्केट कॅप ९०,००० कोटी रुपयांखाली आले आहे.

IPO नंतरची कामगिरी

लेंसकार्टचा IPO मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आला होता, याचा इश्यू प्राइस ₹४०२ होता, तर लिस्टिंग BSE आणि NSE वर १० नोव्हेंबर रोजी लिस्टिंग झाली. दरम्यान, या वर्षात शेअरमध्ये सुमारे १७.५८%, तर गेल्या सहा महिन्यांत २७.९१% तेजी नोंदली गेली आहे.

नेमका काय वाद झाला?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ‘ड्रेसकोड/ग्रूमिंग’ डॉक्युमेंट्समुळे वाद निर्माण झाला होता. कंपनीने आपल्या स्टोअरमध्ये काम करणाऱ्यांना गंध अथवा टिकली लावण्यास मनाई केली होती. वाद वाढल्यानंतर कंपनीने सार्वजनिक माफी मागितली. तसेच, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीकांना परवानगी दिली. कंपनीचे संस्थापक पीयुष गोयल यांनी स्पष्ट केले की, व्हायरल डॉक्युमेंट जुना आहे, सध्याच्या धोरणात कोणतीही बंदी नाही. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : बाजार में तेजी के बावजूद LensKart के शेयर गिरे; विवाद से पहले ऊँचाई पर थे

Web Summary : बाजार में तेजी के बावजूद LensKart के शेयर गिरे, ड्रेस कोड विवाद के बाद 2% की गिरावट आई। शेयर अप्रैल के उच्च स्तर से 7% से अधिक नीचे हैं। आईपीओ पिछले नवंबर में ₹402 पर था।

Web Title : LensKart Shares Dip Despite Market Rally; Hit Peak Before Controversy

Web Summary : LensKart shares fell despite a market rally, dropping 2% after a dress code controversy. Shares are down over 7% from their April high. The IPO was last November at ₹402.