निराधारांना आधार देण्याचे काम कौतुकास्पद : मकरंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:44 IST2021-08-21T04:44:16+5:302021-08-21T04:44:16+5:30

वाई : ‘गेली अनेक वर्षे बोडके दाम्पत्य सेवाभावीवृत्तीने समाजातील निराधार महिला, पुरुषांना सहारा देत आहेत. अनेकांना त्यांच्या नातेवाइकांशी ...

The work of supporting the destitute is commendable: Makrand Patil | निराधारांना आधार देण्याचे काम कौतुकास्पद : मकरंद पाटील

निराधारांना आधार देण्याचे काम कौतुकास्पद : मकरंद पाटील

वाई : ‘गेली अनेक वर्षे बोडके दाम्पत्य सेवाभावीवृत्तीने समाजातील निराधार महिला, पुरुषांना सहारा देत आहेत. अनेकांना त्यांच्या नातेवाइकांशी भेट घालून देत आहेत. यशोधन ट्रस्ट संस्था ही समाजातील अनाथ बेघर मनोरुग्णांसाठी काम करत आहे. निराधारांना आधार देण्याचे यशोधन ट्रस्टचे काम कौतुकास्पद आहे,’ असे उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.

यशोधन ट्रस्टने बांधलेल्या महिलांच्या विस्तारित कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जयहिंद फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप माने, महादेव मस्कर, शशिकांत पवार, वाई पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, पंचायत समिती सदस्य अनिल जगताप, माजी सभापती वामनराव जमदाडे, सरपंच रफिक ईनामदार, उपसरपंच संतोष नलावडे आदी उपस्थित

होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवी बोडके यांनी प्रास्ताविक केले. संचालिका सोनल बोडके यांनी स्वागत केले.

Web Title: The work of supporting the destitute is commendable: Makrand Patil