शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना संधी उपाध्यक्षपदापर्यंतच !--सांगा... डीसीसी कुणाची?

By admin | Updated: April 3, 2015 23:57 IST

१९४९ मध्ये स्थापन झालेल्या जिल्हा बँकेत १९९३ मध्ये घटनादुरुस्ती होऊन महिलांना राखीव गटातून संधी मिळाली.

दत्ता पवार - कुडाळ  जिल्हा बँकेने आदर्श कामकाजाद्वारे सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत संचालक म्हणून संधी मिळण्यासाठी नेहमीच रस्सीखेच पाहायला मिळाली आहे. १९४९ मध्ये स्थापन झालेल्या जिल्हा बँकेत १९९३ मध्ये घटनादुरुस्ती होऊन महिलांना राखीव गटातून संधी मिळाली. माजी आमदार शालिनीताई पाटील, आशालता कदम, सुनेत्रा शिंदे, मंगल पवार अशा अनेक संधी मिळाल्याने महिला संचालकांनी उठावदर्शक कामगिरी केली; परंतु अध्यक्षपदावर एकाही महिलेला अद्याप संधी मिळालेली नाही. मात्र, दया गजानन बगाडे यांनी उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली.बँकेने विविध पुरस्कार मिळवून नावलौकिक वाढविला आहे. १९९६ च्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा बँकेत महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार महिला राखीव गट निर्माण झाला. १९९३ ते २००२ संचालक मंडळात दया गजानन बगाडे (कोरेगाव), कलावती देशमुख (पाटण), मालनताई जगताप (भणंग) यांचा समावेश होऊन महिला प्रतिनिधींचा जिल्हा बँकेत प्रवेश झाला. तर दया बगाडे यांना १९९४-९६ या काळात बँकेच्या उपाध्यक्ष म्हणून संधी मिळाली. त्यांच्यानंतर जिल्हा बँकेत एकाही महिला संचालकाला अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. संचालक म्हणून काम करताना महिलांनी उठावदार काम करण्याचा प्रयत्न केला आहे.आतापर्यंत २००२-०७ या कालावधीत संजीवनी देशमुख (खटाव), अशालता कदम (जावळी), २००७-१५ सुनेत्रा शिंदे (कुडाळ), मंगल पवार (पाटण) यांनी महिला राखीव गटातून प्रतिनिधित्व केले. महिला राखीव गट वगळता केवळ माजी आमदार शालिनीताई पाटील व दिवंगत राजेंद्र शिंदे यांच्यानंतर काही वर्षांसाठी सुनेत्रा शिंदे यांनीच सोसायटी गटातून प्रतिनिधित्व केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष स्वीकृत संचालकपद रद्दजिल्हा बँकेत जिल्हा परिषद अध्यक्षांना स्वीकृत संचालक म्हणून संधी दिली जाते. त्यानुसार हेमलता ननावरे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, भाग्यश्री भाग्यवंत, ज्योती जाधव, अरुणादेवी पिसाळ या महिला जिल्हा परिषद अध्यक्षांना स्वीकृत संचालक म्हणून संधी मिळाली. मात्र, ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष स्वीकृत संचालकपद रद्द झाल्यामुळे यापुढे जिल्हा परिषद अध्यक्ष स्वीकृत संचालक म्हणून जाऊ शकणार नाही.महिला संचालकसाठी जावळीला जास्तवेळा संधी१९९३ मध्ये जिल्हा बँकेत महिला राखीव गट झाल्यानंतर बँकेत या गटातून आलेल्या महिला संचालकात जावळी तालुक्याला अधिक वेळा संधी मिळाली आहे. मालन जगताप, आशालता कदम, सुनेत्रा शिंदे यांचा संचालक मंडळात समावेश होता. तर आशालता कदम यांनी प्रस्थापितांविरोधी निवडणूक लढवून विजय मिळविला होता.