शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरेच्या संवर्धनासाठी महिलांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्‍चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर पर्यावरण व वातावरणीय विभाग ...

निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्‍चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर पर्यावरण व वातावरणीय विभाग कार्य करीत असतात. पृथ्वी तत्वाशी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धूपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. वायूचे संरक्षण करताना हवेच्या गुणवत्तेसाठी वायू प्रदूषण कमी करणे, जल विभागात नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण, सागरी किनारे स्वच्छता ठेवणे. अग्नीसाठी ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा-पडीक जमिनी, शेतीचे बांध येथे अपारंपरिक ऊर्जा वापरासाठी प्रयत्न करणे. आकाश विभागात काम करताना स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्‍चित करून मानवी स्वभावातील बदलासाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे बिंबविणे हा प्रमुख उद्देश आहे.

निसर्गाची ही पंचतत्वे अंगिकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकत नाही. जैवविविधतेचे अस्तित्व राहणार नसल्याने ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राबविण्यात येत आहे. महाबळेश्वर पालिकेनेही या अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. शहरातील रांजणवाडी शाळेमध्ये नववर्षाच्या प्रारंभी ‘माझी वसुंधरा शपथ’ घेऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये शहरातील महिला बचतगट, वस्तीस्तरीय संघातील महिलांनी वसुंधरा संवर्धनासाठीची शपथ घेतली.

मुख्याधिकारी पल्लवी पाटील म्हणाल्या, ‘माझी वसुंधरा हे अभियान शहरात विविध उपक्रमांनी प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. ते यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहभागी होत आपले योगदान द्यावे.’

यावेळी नगरसेवक कुमार शिंदे,पालिकेचे संतोष धड,किरण ढेबे पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.