प्रशासनाच्या निषेधार्थ महिलांचे आज उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST2021-03-08T04:36:13+5:302021-03-08T04:36:13+5:30

याबाबत तळमावले येथील सिताई फौंडेशनच्या अध्यक्ष कविता कचरे व अन्य महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळमावले येथे ...

Women on hunger strike today in protest of the administration | प्रशासनाच्या निषेधार्थ महिलांचे आज उपोषण

प्रशासनाच्या निषेधार्थ महिलांचे आज उपोषण

याबाबत तळमावले येथील सिताई फौंडेशनच्या अध्यक्ष कविता कचरे व अन्य महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळमावले येथे शासनमान्य दारू दुकाने बंद करा, या मागणीसाठी २०१९ ला वर्षभर आंदोलने, मोर्चे असा संघर्ष केल्यावर उभी बाटली आडवी करण्यासाठी २६ फेब्रुवारी २०२० रोजी मतदान प्रक्रिया राबविली. मात्र, दारूबंदी व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी तेव्हा संगनमताने गैरप्रकार करून बाटली आडवी होऊ दिली नाही. या गैरप्रकाराची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे २७ फेब्रुवारी २०२० रोजी केली होती. गत वर्षभर त्याची चौकशी करावी यासाठी पाठपुरावा केला. मात्र, प्रशासन दाद देत नाही.

अधिकाऱ्यांनी दारू दुकानदार व काही समाज विरोधी घटकांशी संगनमत करून केलेल्या गैरप्रकाराची चौकशी करणार नसाल तर तसे लिखित स्वरूपात कळविण्यात यावे. कारण आता महिलांची सहनशीलता संपली आहे. याविरोधात आम्ही ८ मार्च या जागतिक महिला दिनी उपोषणास बसणार आहोत. तसेच यापुढे होणाऱ्या आंदोलन, मोर्चा व संघर्षाची, परिणामाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा दिला आहे.

निवेदनावर कविता कचरे, सुमन ताईगडे, सीमा ताईगडे, तारूबाई ताईगडे, सुनीता भुलूगडे, वनिता ताईगडे, प्रियंका ताईगडे, आदी महिलांनी हे निवेदन दिले आहे.

Web Title: Women on hunger strike today in protest of the administration