ताकवली येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:18+5:302021-07-20T04:26:18+5:30

सातारा: तालुक्यातील ताकवली येथे एका महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मीरा हणमंत वायकर (वय ४१, रा. ...

Woman commits suicide by hanging at Takwali | ताकवली येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

ताकवली येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

सातारा: तालुक्यातील ताकवली येथे एका महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मीरा हणमंत वायकर (वय ४१, रा. ताकवली, पो. नित्रळ, ता. जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मीरा वायकर यांनी दि. १८ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ताकवली गावच्या हद्दीत शांताराम गोविंद लोटेकर यांच्या शेतामध्ये असणाऱ्या राईच्या ओढ्याजवळ आयनाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, मीरा यांचा मृतदेह कुजल्यामुळे तो सडून खाली पडला होता. याबाबतची तक्रार प्रदीप हणमंत वायकर (वय ४८, रा. ताकवली) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक आवळे करत आहेत.

Web Title: Woman commits suicide by hanging at Takwali