शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘हेल्पलाइन’च जेव्हा ‘हेल्पलेस’ होते..

By admin | Updated: November 25, 2015 00:37 IST

सुरक्षा महिलांची : संकटकाळात मदत मागितल्यास तक्रारदाराचा होतोय ‘फूटबॉल’%%स्टिंग आॅपरेशन

सातारा : कौटुंबिक हिंसाचार, जाचहाट, शारीरिक छळ, शोषण अशा राक्षसांचे भय जिल्ह्यातील महिलांना वाटू नये, यासाठी पोलिसांतर्फे सुरू केलेली ‘हेल्पलाइन’ चाचपडत उत्तरे देत असल्याचा अनुभव ‘लोकमत टीम’ला आला. आणीबाणीच्या वेळी ही ‘हेल्पलाइन’ कुचकामी ठरण्याचीच शक्यता अधिक असून, ‘इकडे फोन करा,’ ‘तिकडे तक्रार नोंदवा,’ असे सांगून तक्रारदाराचा ‘फूटबॉल’च करायचा असेल, तर ‘हेल्पलाइन’ हवीच कशाला, असा प्रश्न निर्माण होत आहे.२५ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय महिला अत्याचारविरोधी दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर अन्यायग्रस्त महिलांना सुविधा पुरविण्यासाठी पोलिसांकडून देण्यात आलेल्या ‘१०९१’ या ‘हेल्पलाइन’ची खरंच काही ‘हेल्प’ होते का, याबाबत ‘लोकमत टीम’ने स्टिंग आॅपरेशन केले. अडचणीत असणाऱ्या महिलेला कमीत कमी वेळात आपल्यावरील अन्यायाची माहिती द्यावी लागते. कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलेवर सतत घरच्यांची पाळत असते. अशा महिलेला या ‘हेल्पलाइन’चा अजिबात उपयोग नाही, असे ‘लोकमत टीम’च्या निदर्शनास आले. सोमवारी संध्याकाळी आठनंतर ‘१०९१’ क्रमांक डायल केला असता, सातारा पोलीस कंट्रोल रूममध्ये लागला. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने तो उचलला. ‘आमच्या नातेवार्इ$क महिलेसंदर्भात तक्रार द्यायची होती,’ असे सांगताच महिला कर्मचाऱ्याने ‘एलसीबीत (गुन्हे शाखेत) तक्रार नोंदवा,’ असे उत्तर दिले. ‘संबंधित महिला नातेवाईक साताऱ्यातील नसून, तिला घराबाहेर पडता येत नाही म्हणून आम्ही ‘हेल्पलाइन’ला कॉल केला आहे,’ असे महिला कर्मचाऱ्यास सांगितले असता, २३३९२३ हा ‘एलसीबी’चा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला. तसेच ‘टर्मिनलचा नंबर’ म्हणून आणखी एक क्रमांक देण्यात आला. त्यानंतर ‘लोकमत टीम’ने गुन्हे शाखेशी वरील क्रमांकावर संपर्क साधला. ‘हेल्पलाइन’मधून हा नंबर दिला असून, आम्हाला तक्रार द्यायची आहे,’ असे सांगितले. परंतु ‘कंट्रोल रूमशी संपर्क साधा,’ असे उत्तर ‘एलसीबी’तून देण्यात आले. ‘हेल्पलाइन’साठी तेथेच स्टाफ पुरविण्यात आला असून, हे पथक खास महिलांसाठीच आहे, असेही सांगण्यात आले. (लोकमत टीम)त्रोटक उत्तरे...‘हेल्पलाइन’ सुरू आहे; मात्र ती ‘हेल्पलेस’ आहे, असे स्पष्ट झाल्यानंतर या ‘हेल्पलाइन’च्या माध्यमातून वर्षभरात किती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, याबाबत माहिती ‘एलसीबी’कडे विचारण्यात आली. मात्र, तेथून पुन्हा ‘कंट्रोल’ला (नियंत्रण कक्षात) संपर्क साधण्यास सांगण्यात आले. ‘कंट्रोल’मधील ‘१०९१’ क्रमांकावर विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्रोटक उत्तरे मिळत असल्याने या ‘हेल्पलाइन’मुळे खरेच कुणाला ‘हेल्प’ झाली आहे का, हे स्पष्ट होऊ शकले नाही.