शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

पंतांच्या जवळीकीचा पाटणला किती फायदा?

By admin | Updated: December 1, 2014 00:21 IST

देसार्इंच्या नावाची चर्चा: पुन्हा एकदा तालुक्यात लालदिव्याची चाहूल

अरुण पवार - पाटण -- : शिवसेना शासनामध्ये सामील होणार, अशी चिन्हे दिसत असतानाच आमदार शंभूराज देसाई व मुख्यमंत्री फडणवीस यांची जवळीक अनेकांनी पाहिल्याने पुन्हा एकदा पाटणला मंत्रिपद मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कऱ्हाड विमानतळावर घेतलेली भेट चर्चेचा विषय बनली असून, यापूर्वी झालेल्या पाच मुख्यमंत्र्यांशी शंभूराज यांची जवळीक होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार शंभूराज देसाई यांची मैत्री असल्याचा प्रत्यक्ष अनुभव पाटणच्या जनतेने २००४ मध्ये घेतला आहे. शंभूराज देसाई आमदार असताना विविध ठिकाणच्या पाच आमदारांना त्यांनी पाटणमध्ये आणले होते. एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या पाच आमदारांमध्ये सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस हेही होते. नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना मरळी कारखान्यावर आले होते. त्यानंतर राणे यांचे शिवसेनेशी मतभेद झाल्यानंतर २००४ मध्ये राणे यांनी शिवसेनेचे काही आमदार माझ्या संपर्कात आहे, असे वक्तव्य केले होते. यात शंभूराज देसाई यांचा समावेश असल्याचे तर्क निघाले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी देखील शंभूराज देसार्इंची जवळीक होती. देसार्इंना मिळालेला ‘उत्कृष्ठ संसदपटू आमदार’ पुरस्कार हा मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कारकिर्दीतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख व शंभूराज देसार्इंची अत्यंत जिवाभावाची सलगी होती.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त पाटणमध्ये येऊन विलासरावांनी शंभूराज देसार्इंची स्तुती करताना विधानसभेत देसार्इंची लक्षवेधी ऐकण्यासाठी मी मुद्दामहून विधानभवनात हजर राहत होतो, असे सांगितले होते.

तालुक्यासाठी मैत्रीचा उपयोग होणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार शंभूराज देसाई यांच्या जवळीकतेचा फायदा पाटण तालुक्यासाठी होईल, अशी शक्यता आहे. देसार्इंना मंत्रिपद मिळो अथवा न मिळो. मात्र, निधी खेचून आणण्यासाठी ही मैत्री फायदेशीर आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना शंभूराज देसार्इंनी त्यांच्याशी जवळीक साधून कामे करून घेण्याचा मोठा प्रयत्न केला. चव्हाणांना कारखान्यावर आणले. मात्र, त्या सरकारकडून शंभूराज यांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. तरीसुद्ध मुख्यमंत्री चव्हाण ज्या-ज्यावेळी कऱ्हाडला यायचे तेव्हा शंभूराज देसाई न चुकता त्यांची भेट घ्यायचे.