शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या तोंडावर विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

गत सात-आठ वर्षांपासून पाऊसकाळ कमीकमी होत असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गेल्या दीड महिन्यापासून विहिरीतील पाणीपातळी हळूहळू ...

गत सात-आठ वर्षांपासून पाऊसकाळ कमीकमी होत असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गेल्या दीड महिन्यापासून विहिरीतील पाणीपातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. तर, महिन्यापूर्वीच लहान-मोठे ओढे, नाले, बंधारे आटले असून सर्वत्र ठणठणाट आहे. नदीवरून पाणीपुरवठा करून क्षेत्र ओलिताखाली आणलेल्या लिफ्ट इरिगेशन पाणीयोजनांच्या क्षेत्रात असणा-या विहिरी ब-यापैकी पाझरत असल्याने सहा-सात तास वीजपंप चालत आहेत. त्याच भागातील मोठ्या ओढ्याला धार चालू आहे. त्याचेही पाणी कमी होऊ लागले आहे. गत सहा ते सात वर्षांपासून पाऊसकाळ कमी होत चालल्यामुळे विहिरींची पाणीपातळी खालावत चालली आहे. एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वीच दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असून अनेक शेतक-यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. दररोज कसाबसा एक ते दीड तासच विद्युतपंप चालत असून दोन ते तीन स-या पाणी पाजून होत आहे. पुढील महिन्यात पूर्णपणे विहिरी आटतील, अशी भीती शेतक-यांतून व्यक्त होत आहे.

सध्या अनेक शेतक-यांनी पर्यायी सोय असणा-या ठिकाणी तासावर भाडेतत्त्वावर पाणी घेतले आहे. गत चार-पाच वर्षांपासून एप्रिल, मे व पाऊस पडण्यापूर्वी जूनचे काही दिवस विहिरींची पाणीपातळी कमी होत असल्यामुळे शेतात कोणतेही पीक घेता येत नाही. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच लहान-मोठे ओढे कोरडे पडल्याने शेतकरी वळीव पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे. चालू वर्षी मे महिना सुरू होण्यापूर्वीच विहिरी तळ गाठतील, अशी भीती आहे.

- चौकट

पिकांनी माना टाकल्या

माळरान व हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतक-यांनी उशिरा टोकण केलेले गहू, हरभरा पिके कसेबसे काढले आहे. आता ऊस पिकाला पाणी मोठ्या प्रमाणात लागत आहे. भरपूर पाणी नसल्यामुळे अनेक शेतक-यांची ऊस पिके पिवळी पडू लागली आहेत.

- कोट

चालू वर्षी एप्रिल महिन्यातच विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या विहिरींवर दोन तासच विद्युतपंप चालत आहे. पाऊस सुरू होईपर्यंत पिके जगविणे अवघड झाले आहे. वळीव पाऊस पडला तर पिके जगतील. अन्यथा, चालू वर्षी अवघड परिस्थिती आहे.

- सागर शेडगे, शेतकरी

विहे-शेडगेवाडी, ता. पाटण

फोटो : २१केआरडी०५

कॅप्शन : प्रतिकात्मक