शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

हमरस्ता नव्हे... शेतातली पायवाट !

By admin | Updated: September 11, 2014 23:01 IST

रांजणीपाटी-पळशी रस्त्याची दुरवस्था : २५ वर्षांचा वनवास संपणार कधी? ग्रामस्थांचा सवाल

शरद देवकुळे - पळशी -माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील खडी उखडलेली आहे. तर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय, चालणेही अवघड झाले आहे. वाहनचालकांनी काही ठिकाणी मोकळ्या शेतातूनच रहदारी चालू केली आहे. परिणामी, शेतकरी व वाहनचालक यांच्यामध्ये नेहमीच शाब्दिक चकमकी उडताना दिसत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून रस्त्याची अवस्था जैसे थे असून आता तरी हा वनवास संपनार का? असा प्रश्न ग्रामस्थांतून केला जात आहे. पळशी-रांजणीपाटी हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, रांजणीपाटी येथे शिंगणापूर-म्हसवड या मुख्य रस्त्याला जोडलेला आहे. हाच रस्ता पुढे रांजणी गावाला जातो. परिसरातील माळीखोरा, माळेवस्ती, बिडवेवस्ती, काळेवस्ती येथील ग्रामस्थ नेहमीच पळशीला कामानिमित्त तसेच रेशनिंगसाठी व आठवडी बाजारासाठी नेहमीच ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे या परिसरासह रांजणी, भालवडी, पुजारमळा येथून दर पौर्णिमेला गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात. गोंदवले येथे जाण्यासाठी हाच नजीकचा मार्ग असून, रस्त्याची दुर्दशा झाल्याने भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पळशी येथे शिक्षणासाठी विद्यार्थी याच रस्त्याने जात असतात. विद्यार्थ्यांनाही दररोज याच रस्त्याच्या जाचातूनच जावे लागत आहे. तरी संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.